corona update:अकोला: आज दिवसभरात ६२ पॉझिटिव्ह; २मयत

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज दिवसभरात ६२ पॉझिटिव्ह; २मयत
  
                              f i l e p h o t o

*आज मंगळवार दि. २९ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१९०*
*पॉझिटीव्ह-६२*
*निगेटीव्ह-१२८*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  १९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सहा महिला व १३ पुरुष  आहे. त्यातील मुरारका मेडीकल व कौलखेड येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित शिवाजी नगर, किर्ती नगर, सिंधी कॅम्प, आरटीओ रोड, किरोली, निपाणा, शरद नगर, घूसर, आदर्श कॉलनी, जीएमसी, मोठी उमरी, रेणूका नगर, मलकापूर, गिरी नगर व झेडपी कॉलनी  येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान आज दोघाचा मृत्यू झाला. त्यात पारद, ता. मुर्तिजापूर येथील ५० वर्षीय पुरुष  असून ते २६ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला. तसेच  बार्शिटाकळी येथील ८५ वर्षीय पुरुष असून ते २१ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.


 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३९ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून २२ जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण, युनिक हॉस्पीटल येथून दोन जण,अवगत हॉस्पीटल येथून दोन जण, अकोला ॲक्सीडेंट क्लिनिक येथून पाच जण, हॉटेल रिजेन्सी येथून एक जण तर होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले १२० जणांना, अशा एकूण १९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. 
 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६०५१+११७४+१५५=७३८०*
*मयत-२२९*
*डिस्चार्ज- ५६८९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १४६२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या