- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*:अकोला:आज १२८ पॉझिटिव्ह; ३ मयत
*आज बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२३८*
*पॉझिटीव्ह- १२८*
*निगेटीव्ह - ११०*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी ४४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४ महिला व ३० पुरुषांचा समावेशआहे. त्यातील मुर्तिजापूर येथील ३३ जण, जीएमसी येथील तीन जण, तर उर्वरित पडोळे लेआऊट, सिंधी कॅम्प, तारा बिल्डिंग,पत्रकार कॉलनी, शिरसोली, लहान उमारी, करतवाडी व सोनोरी ता.मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज तीन जणांचे मृत्यू झाले. त्यात जैनपूर पिंपळी, ता. अकोट येथील ८९ वर्षीय पुरुष असून तो ८ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला, लहान उमरी, अकोला येथील ७५ वर्षीय महिला असून ती १५ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर करारवाडी, अकोला येथील ६७ वर्षीय पुरुष असून तो १६ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४० जण, कोविड केअर सेंटर अकोला येथून १४ जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच जण, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन जण, ओझोन हॉस्पीटल येथून चार जण, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून पाच जण, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून एक जण, कोविड केअर सेंटर,अकोट येथून पाच जणांना असे एकूण ७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ४८१०+९७४+१५५=५९३९*
*मयत-१९२*
*डिस्चार्ज- ४४९०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १२५७*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा