corona update: *कोरोना अलर्ट*:Akola:आज ३७ पॉझिटिव्ह; १मयत

*कोरोना अलर्ट*:Akola:आज ३७ पॉझिटिव्ह; १मयत


*आज  शुक्रवार  दि. २५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१३५*
*पॉझिटीव्ह-३७*
*निगेटीव्ह-९८* 



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १२ महिला व २५ पुरुष आहे. त्यात जीएमसी येथील सहा  जण, मुर्तिजापूर येथील पाच जण, डाबकी रोड, कौलखेड, अकोट येथील प्रत्येकी तीन जण, सिरसो ता.मुर्तिजापूर, चोहट्टा बाजार, जऊळका येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित लहान उमरी, वाशिम बायपास, न्यु खेतान नगर, मोठी उमरी, जूने शहर, गोकूल कॉलनी, तापडीया नगर, सिंधी कॅम्प, अकोली जहागीर, बोर्डी ता. अकोट व करोडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण वाशिम बायपास, अकोला येथील ७५ वर्षीय महिला असून ती २४ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.



दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५७३८+१०८६+१५५=६९७९*
*मयत-२१८*
*डिस्चार्ज- ५१४४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १६१७* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या