corona update: *कोरोना अलर्ट*: Akola:दिवसभरात ६२ पॉझिटिव्ह; ३ मयत

*कोरोना अलर्ट*:Akola:दिवसभरात ६२ पॉझिटिव्ह; ३ मयत



*आज शुक्रवार  दि. २५ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३०४*
*पॉझिटीव्ह-६२*
*निगेटीव्ह-२४२*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात नऊ महिला व १६ पुरुष  आहे. त्यातील बार्शीटाकळी व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी चार जण, चिंचोली रुद्रायणी, मुर्तिजापूर व एलआयसी क्वॉटर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित परसोबढे, सोनखेड, वानखडे नगर, बोरगाव मंजू, चांदूर, रामनगर, सिंधी कॅम्प, तापडीया नगर, वाशिम बायपास, उमरी व फिटे प्लॉट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान आज तिघांचा मृत्यू झाला. त्यात मुर्तिजापूर येथील ४० वर्षीय पुरुष असून ते २३ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, पाथर्डी ता. तेल्हारा येथील ७० वर्षीय महिला असून ती १५ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर डाबकी रोड, अकोला येथील ५० वर्षीय महिला असून ती २१ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.

 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ५९ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून सहा जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, युनिक हॉस्पीटल येथून चार जण, आर्युवेदीक महाविद्यालय येथून एक जण, हॉटेल रिजेन्सी येथून चार जण व  कोविड केअर सेंटर, बाळापूर येथून चार जणांना डिस्चार्ज देण्यात आले. तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला अशा ११० जणांना अशा एकूण १९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५७६३+१०८६+१५५=७००४*
*मयत-२२१*
*डिस्चार्ज- ५३३५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १४४८*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या