आमदार प्रकाश भारसाकळे यांना कोरोना संसर्ग;खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
MLA Prakash Bharasakle contracted corona and started treatment at a private hospitalअकोटचे भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांना कोरोना संसर्ग झाला असून, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अकोला येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये त्यांचेवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अकोला: अकोट विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे आणि त्यांचे स्वीय साहयक कोरोना बाधित झाले आहेत. त्यांच्यावर अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात चार दिवसांपासून उपचार सुरू असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली.
भारसाकळे हे मार्च पासून त्यांच्या दर्यापूर येथील निवासस्थानीच होते.मात्र,मध्यन्तरी ते अकोला येथे भाजपच्या कार्यक्रमात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाच्या शासकीय सभांना उपस्थित राहिले होते.
चार दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने रुग्णालयात गेले.त्यांना covid-19 चाचणी करण्याचा सल्ला मिळाला. त्यांची covid-19 चाचणी करण्यात आल्यानंतर,त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर त्यांच्या स्वीय सहाययकची देखील चाचणी केली असता,ते देखील पॉझिटिव्ह निघाले. आमदार भारसाकळे आणि त्याच्या स्वीय सहहयक यांच्यावर उपचार सुरू असून,दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे,असे सूत्रांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा