corona treatment:आरोग्यविषयक सुविधा, बेड, ऑक्सिजन पुरेशी उपलब्ध असल्याचा सरकारचा दावा फोल! Govt's claim that health facilities, bed oxygen is adequate!

आरोग्यविषयक सुविधा, बेड, ऑक्सिजन पुरेशी उपलब्ध असल्याचा सरकारचा दावा फोल!

 Govt's claim that health     facilities, bed oxygen is   adequate!



अकोला: सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकार, पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि चक्क डॉक्टर देखील कोरोना बाधित होऊन रुग्णालयात जागा न मिळाल्याने मृत्युमुखी पडत आहे.तरी सरकारचा दावा आहे की, सर्व आटोक्यात आहे, मुबलक आरोग्य सुविधा उपलब्ध आहे. पण आघाडी सरकारच्या आमदारानेच हा दावा फोल ठरविला आहे. समाज माध्यमातून हे त्यांनी उघड केले आहे.



सरकारने तर जाहिरच केलं आहे की "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" म्हणजे आता नागरिकांचे आरोग्य, जीव आणि त्यांचे कुटुंबीय ही सरकारची जबाबदारी नाही.आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे पाहून घ्या, आमच्यावर विसंबून राहू नका,असे वंचित बहुजन आघाडीने म्हंटले आहे. 



"जनतेला आरोग्य सुविधा सरकारने उपलब्ध करून द्यायची ह्याचा विसर जनप्रतिनिधीना पडलेला दिसतो. सत्ताधारी पक्षाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी ह्यांचा फेसबुकवरील कबुलीजबाब वाचा.आपल्या लक्षात येईल की, आघाडी सरकार गेली सहा महिने कोरोना विरोधात आरोग्य सुविधा उभी करण्यात आणि खाजगी रुग्णालयाच्या मनमानीवर अंकुश ठेवण्यास पूर्ण अपयशी ठरली आहे." 

                                   राजेंद्र पातोडे,
                                      प्रदेश प्रवक्ता 
                         वंचित बहुजन आघाडी


 
 राजेंद्र पातोडे यांनी उपलब्ध करून दिलेली
आमदार अमोल मिटकरी यांनी लिहलेली FB पोस्ट 


"मी अनुभवलेली कालची एक निगरगट्ट रात्र "
 माझ्या मित्रांचे वडील काल कोरोना  पॉझिटिव्ह आले हे समजताच त्यांनी मला संपर्क केला. संपर्क याकरिता केला की त्यांच्या वडिलांना ICU मध्ये  ऍडमिट करायला बेड आणि व्हेंटिलेटर ची आवश्यकता होती. ज्यांनी फोन केला ते  आर्थिक दृष्ट्या अत्यंत सक्षम होते. अकोल्यामध्ये "आयकॉन" आणि "ओझोन "असे दोन हॉस्पिटल आहेत. मात्र तिथे त्यांची व्यवस्था होऊ शकली नाही.  पैसा उपलब्ध असतानासुद्धा अकोला जिल्ह्यात बेड उपलब्ध न होणे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.


सर्वानुमते  निर्णय घेऊन एका खाजगी  डॉक्टरच्या सल्ल्या वरून  आम्ही पेशंट ला नागपुर मध्ये  "वोकार्ड" हॉस्पिटल ला (बेड व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे  सांगितल्यावर)  त्यांच्यावर विश्वास ठेवून  एका सुसज्ज ॲम्बुलन्स मध्ये रात्री एक वाजता मेडिकल ऑफिसर घेऊन नागपूरला पाठविले. रात्री साडे तीन वा. पेशंट घेऊन ॲम्बुलन्स त्या  हॉस्पिटल समोर पोहोचली.  मला रात्री साडेतीन वाजता मित्रांनी   कॉल केला व ॲम्बुलन्स बाहेर उभी आहे मात्र आत बेड उपलब्ध नाहीत असे डॉक्टर सांगताहेत असे सांगितले. 


पेशंट फक्त ऑक्सिजनवर आहे आणि खाजगी डॉक्टर च्या सांगण्यावरून आपण तिथपर्यंत पेशंट पाठवल्यानंतर सुद्धा समोरच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करत नसतील  तर ही बाब फार गंभीर आहे.मी तितक्याच रात्री एका खाजगी कोविड सेंटर वर काही डॉक्टर  मित्र व मी  अनेक डॉक्टरच्या  संपर्कात राहिलो मात्र रात्री साडेतीन वाजता कुठल्याच डॉक्टरांनी प्रतिसाद दिला नाही. 


नागपूरमधील लता मंगेशकर हॉस्पिटल, Kings Way Hispital,  ऑरेंज सिटी हॉस्पिटल, ऍलेक्सीज हॉस्पिटल, Woachard  हॉस्पिटल,  7 स्टार हॉस्पिटल,आदी  हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर मुंदडा,  डॉक्टर मरार,  डॉ. अग्रवाल,  सुजाता मॅडम, कावेरी मॅडम, आदी  डॉक्टरांशी संपर्क केला मात्र या सर्व श्रीमंत डॉक्टरांपैकी कोणीही कुठलाही कसलाही प्रतिसाद दिला नाही.


नंतर वर्धा, सावंगी मेघे, याठिकाणी फोन केले. पेशंटला परत इथे आणावे का तर अकोल्यातील सर्व दवाखान्यात फोन केले. सरकारी दवाखाने हाउसफुल, प्रायव्हेट दवाखाने हाउसफुल,  नागपुर मधील दवाखाने हाउसफुल, पेशंट कडे स्वतःच्या गाड्या आहेत, अनेक मोठ्या लोकांशी संपर्क आहेत,  असे असताना सुद्धा पेशंटला एक व्हेंटिलेटर व बेड उपलब्ध नसणे हे फार धक्कादायक आहे.  अखंड प्रयत्नानंतर शेवटी सरकारी दवाखान्यातच  सद्यस्थिती पेशंटला भरती करावे लागले आहे. 


(विचार करण्यासारखी बाब ही की मी आमदार असतांना व पेशंट सुद्धा आर्थिक सक्षम असतांना जर प्रायव्हेट डॉक्टर्स असा जीवघेणा खेळ खेळून, रात्री फोन बंद करून प्रतिसाद देत नसतील तर सामान्य माणसाचं जगणं म्हणजे हा एक फक्त खेळ आहे असे समजायचे का?? )


श्रीमंत लोकांची अशी अवस्था तर  गोरगरिबांच्या अवस्था किती बिकट असतील ना??  ........
अमोल मिटकरी, विधान परिषद सदस्य ह्यांचे फेसबुक पोस्टचा काही भाग.)

टिप्पण्या