कारागृहातुन कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन आरोपींचे पलायन!
Two corona-positive accused escape from jail
पुणे,दि.१०: येरवडा तात्पुरते कारागृह येथून आज गुरुवार,१० सप्टेंबर रोजी अंदाजे १.१५ वाजता दोन आरोपीनी पलायन केले. अनिल वेताळ आणि विशाल खरात असे या दोघांची नावे आहेत.विशेष म्हणजे हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
अनिल विठ्ठल वेताळ (वय 21 वर्षे) हा गणेश नगर, भीमा कोरेगाव, ता-शिरूर, जि- पुणे येथील रहिवासी आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे त्याच्यावर भादवी कलम 394,411,34 नुसार गुन्हे दाखल आहेत.
दुसरा आरोपी विशाल रामधन खरात आहे. फातिमा मज्जित समोर श्री समर्थ हौसिंग सोसा, घर नं 5 निगडी पुणे येथील तो रहिवासी आहे.चिखली पो. स्टे. पिंपरी चिंचवड येथे भादवी कलम 307, 323, 143, 147, 148, 149 नुसार त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
न्यायालयीन कोठडीत असलेले तात्पुरते कारागृहाची बिल्डिंग क्र 104, पहिला मजला, रूम नं 1 मधून दोघेही पळून गेले आहेत. दोन्ही आरोपी हे कोरोना पोझिटिव्ह आहेत.
या आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. आरोपी कुणास आढळल्यास येरवडा पोलीस ठाण्यात संपर्क करावे,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा