Charmakar sangha:महाराष्ट्र चर्मकार महासंघाचा २६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा Celebrating the 26th anniversary of Maharashtra Charmakar Mahasangha with enthusiasm

महाराष्ट्र चर्मकार महासंघाचा २६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

Celebrating the 26th anniversary of Maharashtra Charmakar Mahasangha with enthusiasm


अकोला: महाराष्ट्र  राज्यातील समस्त चर्मकार समाजातील  लोकांचा विकास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या  महाराष्ट्र चर्मकार महासंघाचा २६ वा वर्धापन दिन गुरुवारी साजरा करण्यात आला.



राज्यातील चर्मकार समाजातील उपवर वर- वधू, तसेच उच्चशिक्षणपूर्ण करीत  असलेले  समाजाचे भावी उध्दारक यांना प्रोत्साहीत करण्यासाठी  त्यांचा गुणगौरव करणे  तसेच चर्मकार समाजाला विकसित करण्यासाठी योग्य  तज्ञाचे  मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आदी विविध विकास कामांसाठी नानासाहेबांनी २५ वर्षे पूर्वी पेरलेले महाराष्ट्र चर्मकार महासंघ हे  रोपटे  आता २६ वर्षाचे झाले . हे छोटंसं रोपटं लावलं होत त्याच रूपांतर आज  "राष्ट्रीय चर्मकार महासंघ "म्हणजे वटवृक्षात झाले.  ज़िल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हिल लाईन येथे संघटनेचा वर्धापन दिन मोठया उत्सहात आणि कोविड १९ मुळे निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला.



कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक पांडुरंग वाडेकर हे होते.कार्यक्रमात  केंद्रीय सदस्य तथा  विदर्भ प्रमुख  गजानन  भटकर, युवा प्रमुख रामाभाऊ उंबरकर यांनी संघटना  अधिक मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला  जिल्हा महिला अध्यक्षा  तथा राज्य कार्यकारिणी सदस्या प्रतिभा शिरभाते, संज्योती मागे, के टी पद्मने, रामभाऊ ताजने, संतोष इंगळे, महानगर अध्येक्ष शिवलाल इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण चोपडे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 



कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून सॅनिटायझर आणि  सामाजिक  सुरक्षित अंतराचे  पूर्णपणे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला  ,  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण चोपडे यांनी केले

टिप्पण्या