BJP Akola: शेतक-यांना हेक्टरी २५ व ५० हजार मदत देऊन उध्दव ठाकरे यांनी शब्दाला जागावे Uddhav Thackeray should raise the word by giving Rs 25,000 and Rs 50,000 per hectare to farmers

शेतक-यांना हेक्टरी २५ व ५० हजार मदत देऊन उध्दव ठाकरे यांनी शब्दाला जागावे

    अकोला जिल्हा भाजपचा सवाल
Uddhav Thackeray should raise the word by giving Rs 25,000 and Rs 50,000 per hectare to farmers



अकोला: अकोला जिल्हा सह विदर्भातील अनेक भागात अतिवृष्टी व सातत्याने पडणा-या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून महाराष्ट्र्रातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना कायमच मदतीविना वाऱ्यावर सोडले आहे. मुख्यमंत्र्यासह सत्ताधा़ऱ्यांचे बोलाचीच कडी अन् , बोलाचाच भात असे वागणे आहे. आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी जिरायती २५ हजार व बागायती ५० हजार रुपये द्यायला हवे म्हणणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या आपल्या शब्दाला कधी जागणार ? असा सवाल करुन आपदग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. 


रणधीर सावरकर पुढे म्हणाले की, विदर्भातील व राज्यातील अनेक भागातील चालु खरीप हंगामातील शेतक-यांच्या पिकांचे अतिवृष्टी आणि सातत्याने पडणारा पाऊस यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. यापुर्वीही नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेला परतीचा पाऊस व अतिवृष्टीमुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यानंतर मार्च व एप्रिल २०२० मध्ये प्रचंड वेगाचा वादळी वारा, अवकाळी पाऊस व  रब्बी हंगामातील काढणी करुन ठेवलेल्या आणि काढणीस आलेल्या ज्वारी, गहु, हरभरा पिकांचे त्याबरोबरच आंबा, , , संत्रा, केळी भाजीपाला कांदा नींबू, फळपिकांचे आणि पालेभाज्यांचे अतोनात नुकसान झाले. आता पुन्हा पश्चिम विदर्भातील अनेक भागात चालु खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टी आणि सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन, तुर, मका, बाजरी, कपाशी तसेच भाजीपाला आणि फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.



यापुर्वी नोव्हेंबर २०१९ आणि मार्च व एप्रिल २०२० असे तीन वेळा नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीची महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना अद्याप हेक्टरी २५ व ५० हजार तर सोडाच परंतु दमडीचीही मदत दिलेली नाही.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेईपर्यंत नोव्हेंबर २०१९ मध्ये उध्दव ठाकरे यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन ‘कोणतीही अट न घालता हेक्टरी २५ हजार आणि ५० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना दिली पाहीजे म्हणाले होते.’  मात्र, मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर उध्दव ठाकरे यांना आपल्या वक्तव्याचा सोयीस्कर विसर पडला असून अद्याप शेतकऱ्यांना दमडीचीही मदत दिली नाही. यांचे शेतकऱ्यांबद्दलचे प्रेम बेगडी व पुतणा मावशीचे आणि बांधावर शेतकऱ्यांच्या नावाने ढाळलेले अश्रू मगरीचे होते का ? असा संतप्त सवालही आमदार  रणधीर सावरकर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात,महापौर अर्चना मसने यांनी केला.


पश्चिम विदर्भातील शेतकरी सततचा दुष्काळ, नापिकी, नैसर्गिक आपत्ती यामुळे त्रस्त असुन पुरता मेटाकुटीस आलेला असुन गेल्या दहा महिन्यात पश्चिम विदर्भातील शेतक-याला ३-४ वेळा मोठ्या नैसर्गिक आपत्ती तसेच खरीप हंगामातील बोगस बियाने, पिकांची उगवण न होणे, दुबार व तिबार पेरणी करावी लागणे, बँकाकडुन पिक कर्ज न मिळणे यामुळे शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. आतातरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आतापर्यंतच्या झालेल्या सर्व नुकसानीची   बोलल्याप्रमाणे जिरायतीस हेक्टरी २५ हजार व बागायतीस हेक्टरी ५० हजार रुपये मदत तातडीने देऊन संकटात सापडलेल्या शेतक-याला आधार द्यावा अशी मागणी आ.  रणधीर सावरकर यांनी केली आहे.

टिप्पण्या