Ban on onion export:शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण... कांद्याच्या निर्यातीवर बंदी;शेतकरी संघटनेचे ललित बाहाळे स्थानबद्ध। Death of farmers is the policy of the government ... Ban on onion export; Lalit Bahale of farmers' association located

शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण... 


कांद्याच्या निर्यातीवर बंदी;शेतकरी संघटनेचे ललित बाहाळे स्थानबद्ध



Death of farmers is the policy of the government ...


Ban on onion export; Lalit Bahale of farmers' association located


भारतीय अलंकार

अकोला: कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाला विरोध करीत महाराष्ट्रासह देशातील शेतकरी संघटना आज रस्त्यावर उतरल्या आहे. राज्यातील कांदा उत्पादक भागात या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. 


                                      Akola city

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ आज अकोला येथील नेहरू पार्क चौकात दुपारी १२ वाजता शेतकरी संघटनेच्या वतीने  कांदा जाळून मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यामध्ये शेतकरी संघटनेचे विलास ताथोड, डॉ निलेश पाटील, धनंजय मिश्रा, अजय गावंडे, सचिन कोकाटे, मधुकर गायकवाड, विनोद  टाले आदी सहभागी झाले होते.



     पणज येथे रास्ता रोको आंदोलन


शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण ,अशा प्रतिक्रिया आज शेतकरी संघटनेच्या आंदोलनातून उमटल्या. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केलेली आहे .कांद्याचे  बाजार दर २७ रुपये होते. निर्यात बंदी सरकारने घालताच कांद्याचे दर ७ रुपयांवर आले. या निर्णयाच्या निषेधार्थ शेतकरी संघटना तर्फे पणज  (तालुका अकोट ) येथे दुपारी १ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, अशी माहिती लक्ष्मीकांत कौठकर (जिल्हाध्यक्ष,माहिती व तंत्रज्ञान आघाडी शेतकरी संघटना) यांनी दिली.


*कांदा निर्यात बंदी च्या विरोधात राज्यात ठीक ठिकाणी शेतकरी संघटने कडून रस्ता रोको आंदोलन


*शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललित पाटील बाहाळे व इतर कार्यकर्त्यांना स्थानबद्ध


*पोलीस बंदोबस्तात शेतकरी संघटनेचे उपविभागीय अधिकारी कडे निवेदन



केंद्र सरकार ने काल जाहीर केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने राज्यात ठीक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 



पणज येथे रस्ता रोको करतांना शेतकरी संघटनेचे नेते ललित बाहाळे सोबत इतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले.पोलीस बंदोबस्तात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी यांनी अकोट उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात जाऊन निषेध नोंदवला. या वेळी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ललित पाटील बाहाळे यांनी केंद्र शासनाच्या आयात, निर्यात धोरणावर टीका करत असताना विदेश व्यापार मंत्रालयाने औचित्याचा भंग केला असल्याचे ते म्हणाले.



विदेश व्यापार संतुलनासाठी आतापर्यंत कांदा निर्यातीने आपले करत्व पार पाडले.परंतु ज्या निर्यात वाढी साठी या विभागाची स्थापना झाली आहे, त्या विरुद्ध हा विभाग काम करतो आहे.कोविड 19 साथी मुळे जिथे परकीय चलनाची देशाला अत्यंत निकड आहे.अश्या प्रसंगी कुठल्याही निर्यातीवर बंदी आणणे हे राष्ट्रीय हिताचे नाही. निर्यात वाढी करिता स्थापना केलेले कार्यालय निर्यात कमी करण्याचे निर्णय घेत असेल तर ते तात्काळ बंद केले पाहिजे असंही ते म्हणाले. 



अत्यावश्यक वस्तू कायदा कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा आणि करार शेती संबंधि अध्यादेश काढून शेती मालाच्या किमती वरील सरकारी नियंत्रण प्रत्येक्ष अप्रत्यक्षपणे कमी करण्यात आले होते. तसेच बीटी वांग्याची परवानगी दिल्याने नुकतेच शेतकरी संघटनेने या सरकारी निर्णयाचे स्वागत केले होते. कांदा निर्यात बंदी हा सरकार चे शेती माला संबंधितचे धोरण अनिश्चित असल्याचे शेतकरी संघटनेला वाटत आहे ज्या मुळे शेतकऱ्याना च नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्था ला फटका बसण्याची शक्यता आहे,असे देखील बाहळे म्हणाले. 


या प्रसंगी माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख,शेतकरी संघटनेचे माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर,तेल्हारा तालुका प्रमुख निलेश नेमाडे, हरिभाऊ अकोटकार, मधुकर बोचे, वामन वाळके, रवींद्र नवले, व कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.



टिप्पण्या