Babri Masjid verdict: बाबरी मशीद निकाल हा देशहिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल: प्रकाश आंबेडकर

आज आलेल्या निकालांमध्ये सर्वाना निर्दोष सोडून देण्यात आले आहे. न्यायालय असे निकाल देत राहिले तर हे देशहिताचे नाही. लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडून जाईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

The Babri Masjid verdict is not in the interest of the country, people will lose faith in the court: Prakash Ambedkar





मुंबई : बाबरी मशीद पाडणे हे नियोजित षडयंत्र नव्हते, असं सांगत 32 लोकांना विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. मात्र, लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही बाबरी मशीद पाडण्यासाठीच होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निकाल देशहिताचा नसून अशा निकालामुळे लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल, असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. 


बाबरी मशीद प्रकरणावर आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून यामध्ये प्रामुख्याने लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ३२ लोकांवर बाबरी मशीद पाडल्याचा आरोप होता. आज आलेल्या निकालांमध्ये सर्वाना निर्दोष सोडून देण्यात आले आहे. न्यायालय असे निकाल देत राहिले तर हे देशहिताचे नाही. लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडून जाईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.


धार्मिकतेला वाव दिला जात असून देशाला खाली दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या या निकालाला पुन्हा अपिलात गेले पाहिजे व तथ्यांच्या आधारावर ज्यांनी बाबरी मशीद पाडली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

टिप्पण्या