- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत
नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्यासाठी बिहार राज्य सरकारने केलेली शिफारस स्विकारली असल्याचे केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पटना येथे गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबईत वर्ग करावा यासाठी रिया चक्रवर्ती हिने दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी केंद्र सरकारच्या वतीने सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला ही माहिती दिली.
सुशांत याच्या आत्महत्येविषयीचे सत्य समोर यायला हवे असे मत न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या पीठाने यावेळी नोंदविले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा