ShriRam Janmbhumi:अनेक शतकांची प्रतिक्षा संपुष्टात-पंतप्रधान नरेंद्र मोदी

अनेक शतकांची प्रतिक्षा संपुष्टात-पंतप्रधान नरेंद्र मोदी


अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनामुळे अनेक शतकांची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. यासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलं आहे. त्यांना मी नमन करतो, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राम जन्मभूमी मंदिर भूमिपूजन सोहळ्यात  उपस्थितांना संबोधित करताना केले. 


हा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. सामाजिक सलोखा हे रामाच्या प्रशासनाचं मूलभूत अंग होते. 
राम मंदिराची निर्मिती ही देशाच्या एकतेसाठी महत्त्वाची आहे. या राम मंदिरामुळं या संपूर्ण क्षेत्रातल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं ते म्हणाले. 



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत राम मंदिराचं भूमीपूजन केलं. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार आरक्षित जागेवरच्या राम मंदिरासाठी हे भूमीपूजन करण्यात आले.




यावेळी प्रधानमंत्र्यांनी श्री राम जन्मभूमी मंदिराच्या टपाल तिकिटाचंही अनावरण केलं. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महंत नृत्य गोपाल दास यावेळी उपस्थित होते. 


यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी हनुमानगढी येथे जाऊन हनुमानाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पारिजातचं वृक्षारोपण केलं. यावेळी साध्वी उमा भारती, बाबा रामदेव यांच्यासह देशभरातले सुमारे १३५ संत महंत मिळून १७५ निमंत्रित उपस्थित होते. 

टिप्पण्या