ShriRam Janmabhumi:रामराज्याची नीव रोवली;नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजन

रामराज्याची नीव रोवली;नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिर भूमिपूजन


रामोत्सव: श्रीराम जन्मभूमी:अयोध्या नगरी

अयोध्येत राम मंदिराचे आज बुधवार 5 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमी पूजन करण्यात आले. सुमारे पावणे दोनशे लोक त्यासाठी सोहळ्यात उपस्थित होते. यामध्ये १३५ संत-महंतांचा समावेश होता. भूमीपूजनासाठी अयोध्येत सजावटीसोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेट्स लावले होते. सायंकाळी दीपोत्सव साजरा केला जाणार असल्याने शरयू नदीचे घाट सुशोभित करण्यात आले होते.  
अभिजित मुहूर्त
हनुमान गढी पोहचून दर्शन घेतले. अयोध्येच्या पारंपरिक पद्धतीने यावेळी प्रधान मंत्री यांचे पगडी देऊन स्वागत करण्यात आले.हनुमान धाम मधून निघून प्रधानमंत्री रामधामकडे निघाले.
भूमिपूजन स्थळी प्रधानमंत्री पोहचले.यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी सोबत होते. शंखनादात मोदी यांचे स्वागत करण्यात आले.मोदी यांनी रामललाचे दर्शन घेतले. आरती ओवाळून मंदिराला प्रदक्षिणा घातली. साष्टांग नमस्कार केला. यावेळी पारिजातचे वृक्षारोपण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मनमोहक पारिजात फुले देवपूजेत विशेष महत्व असते. मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.

नीव पूजन
उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी भूमिपूजन स्थळी मोदी यांचे स्वागत केले. मोहन भागवत,नरेंद्र मोदी भूमिपूजन अनुष्ठानसाठी खाली बसले. श्री गणेश ,श्रीराम,श्रीसीता, हनुमान,भारत माता, महादेव यांचे आवाहन करून पूजेला सुरवात करण्यात आली.
मंत्रोच्चार पुरोहितांनी केले. यावेळी नऊ शिळा रोवण्यात आल्या.श्रीराम मंदिराची शिळा मोदी यांच्या हस्ते रोवण्यात आली. भगवती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीचे आवाहन करण्यात आले. भरातवर्षच्या उज्वलते साठी प्रार्थना करण्यात आली. यानंतर भारत माता की जय हर हर महादेव चा जयघोष करण्यात आला. ४० ते ४५ मिनीट ही पूजा चालली.

यानंतर मुख्य व्यासपीठाकडे मोदी यांच्यासह मान्यवर विराजमान झाले.नरेंद्र मोदी यांनी राम भक्तांना संबोधित केले.



टिप्पण्या