Shetkari Sanghatna:केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयाचे शेतकरी संघटने तर्फे स्वागत

केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयाचे शेतकरी संघटने तर्फे स्वागत


अकोट : केंद्र व राज्य शासनाने शेती व शेती माला संबंधी घेतलेल्या निर्णयाचे शेतकरी संघटने कडून स्वागत.अत्यावश्यक वस्तू कायदा, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि करार शेती संबंधीत केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशानुरूप राज्य शासनाने रुजू केलेल्या आदेशाचे शेतकरी संघटनेने स्वागत केलेले आहे. 



शेती मालाला अत्यावश्यक वस्तू कायद्यातून आणिबाणी  ची परिस्थिती व्यतिरिक्त वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शेती मालाच्या किमतीवरील सरकारी नियंत्रण बऱ्याच अंशी संपुष्टात येणार असल्याने एका एकी शेती मालाचे भाव पाडण्याचा प्रकार बंद होण्याची शक्यता तयार झालेली आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेती माल विक्रीला आणण्याची सक्ती एका अध्यादेशामुळे संपुष्टात आली असल्याने शेती मालाच्या सरळ ग्राहकामध्ये बऱ्याची अंशी वाढ होण्याची शक्यात निर्माण झालेली आहे. 



तिसरा अध्यादेशाने शेती कसायला दिल्यास शेती वरील मालकी हक्क गमावण्याची भीती संपुष्टात आलेली आहे. शेती क्षेत्रातील खुली करणाला सुरुवात झाल्याचे हे लक्षण असल्याने व शेतकरी संघटना शेती व्यवसायत खुली करणाचा आग्रह धरत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करीत आहे. उप विभागीय अधिकारी अकोट यांच्या कडे तसे  पत्र देण्यात आले. या वेळी शेतकरी संघटना राज्य प्रवक्ते ललित पाटील बाहाळे, माजी जिल्हा प्रमुख सतीश बाबा देशमुख,शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख (माहिती व तंत्रज्ञान आघाडी)निलेश नेमाडे, दिनेश देऊळकार, शेख अनिस शेख रहेमान इत्यादी शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या