Reliance Jio: रिलायन्स जिओने भरला २४ कोटींचा दंड ! Reliance Jio pays Rs 24 crore fine!

रिलायन्स जिओने भरला २४ कोटींचा दंड !


अकोला: अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये विना परवानगीने रिलायंस जिओ डिजीटल फायबर प्रा.लि. कंपनी कडून भुमिगत केबल टाकण्‍यात येत होते. त्‍या अनुषंगाने त्‍यांना अकोला महानगरपालिका प्रशासना कडून काम बंद करणे तसेच केलेल्‍या कामाबद्दल दंड भरण्‍यासाठी सूचना देण्‍यात आली होती.



केंद्रीय राज्‍यमंत्री ना.संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर तसेच महापौर अर्चना जयंत मसने आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांच्‍या अथक प्रयत्‍नामुळे २८ ऑगस्‍ट रोजी रिलायंस जिओ डिजीटल फायबर प्रा.लि. कंपनी कडून दंडाची रक्‍कम म्‍हणून रू. २४ कोटी ८ लक्ष २० हजार रूपयांचा धनाकर्ष (डी.डी.) प्राप्‍त झाला असून, मनपा उपायुक्‍त वैभव आवारे यांनी महापौर अर्चना मसने यांच्‍या सुपुर्त केला.



या वेळी उपमहापौर राजेंद्र गिरी, स्‍थायी समिती सभापती सतीष ढगे, नगर सेवक तुषार भिरड, मनपा उपायुक्‍त वैभव आवारे, मनपा कार्यकारी अभियंता अजय गुजर, माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते जयंत मसने, राजेश सरप, नागोराव निंबरते आदिंची उपस्थिती होती.

टिप्पण्या