nakul sontakke:अखेर प्रशासन झुकले: नकुल सोनटक्के यांचे आंदोलन मागे

अखेर प्रशासन झुकले: नकुल सोनटक्के यांचे आंदोलन मागे

सर्व मागण्या मंजूर : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांची मध्यस्थी


अमरावती:  स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येपासून येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांचे सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले. सोनटक्के यांच्यासमोर प्रशासनाला गुडघे टेकावे लागले. त्यांच्या सर्व मागण्या मंजूर करण्यात आल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे व मानवाधिकार संघटनेकडून मध्यस्थी करण्यात आली.


दर्यापुर तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयी राहावं जिल्हाधिकारी व सीईओ यांच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावे या मागण्यांसाठी येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी 14 ऑगस्ट पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दर्यापूरच्या उपजिल्हा रुग्णालयातून अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तालुक्यातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता. सोनटक्के यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा असल्याची घोषणा केली. ही माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्यापर्यंत पोहोचताच खराटे यांनी तातडीने यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून आंदोलनात मध्यस्थी केली. मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून अमरावतीचे तहसीलदार दिनेश बडीये हे इरविन रुग्णालयात उपस्थित झाले. त्यांनी सोनटक्के यांच्या मागण्या मंजूर करत असल्याचे लेखी पत्र वाचून दखविले. येवद्याचे प्रशासक अनुप कुलकर्णी हे देखील यावेळी उपस्थित होते. मागण्या मंजूर झाल्याने सोनटक्के यांचे आंदोलन सुनील खराटे यांनी ज्यूस पाजुन सोडविले. त्यानंतर तालुक्यातील जनतेमध्ये आनंदाचे  वातावरण पाहायला मिळाले. विदर्भ आंबेडकरी संघटनेचे प्रा.विनोद मेश्राम यावेळी उपस्थित होते. 



येवद्यात जंगी स्वागत
नकुल सोनटक्के यांच्या प्रकृतित सुधारणा झाल्यावर बुधवारी त्यांचे  यांचे उपोषण सोडल्यावर पहिल्यांदा आगमन झाल्यावर गांधी चौक येथे त्यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी त्यांची आई यांनी त्यांना औक्षण केले. आंदोलन कशाप्रकारे यशस्वी झाले, प्रशासन कसे झुकले याबद्दल श्री.सोनटक्के यांनी ग्रामस्थाना माहिती दिली. नागरिकांनी आपले कर्तव्य समजून घ्यावे जागरूक रहावे, असे सांगत त्यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

टिप्पण्या