Ganesh festival2020:श्रीगणेश विसर्जनासाठी अकोला नगरी सज्ज; कृत्रिम तलावांची निर्मिती

श्रीगणेश विसर्जनासाठी अकोला नगरी सज्ज; कृत्रिम तलावांची निर्मिती

अकोला: भक्ती श्रद्धा संस्कार व परंपरा कायम ठेवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर  सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने यांच्या नेतृत्वात नगरसेविका  गितांजली शेगोकार,  भाजपा गटनेते राहुल देशमुख, नगरसेवक हरीश काळे ,सामाजिक कार्यकर्ते  सागर शेगोकार यांनी अत्याधुनिक सुविधासह भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे.


राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भारत विद्यालय जवळ तापडिया नगर ,रामदास पेठ, जठारपेठ  तसेच प्रभाग क्रमांक ३,४,५,६,१३,१२ गणेश भक्तांच्या सोयीसाठी  संपूर्ण पूजा व्यवस्था सह तसेच गणेश विसर्जन तलावमध्ये सप्त नदीचे जल शुद्धीकरण करून भरले आहे. गणेश विसर्जन साठी मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.  



भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विनोद मापारी, माजी उपमहापौर वैशाली शेळके, धनंजय धबाले यांनी सुद्धा भक्तांसाठी आपल्या प्रभागात श्रीगणेश विसर्जन साठी सुविधा उपलब्ध केले आहेत. तसेच धनंजय धबाले, संजय बडोणे, मंगला  सोनवणे ,माधुरी बडवणे तसेच मनपा सभा गूह नेत्या योगिता पावसाळे यांनी सुद्धा भक्तांसाठी सोय केली आहे.    

महापालिका तर्फे सुविधा
मनपातर्फे हरिहर पेठ ,गणेश घाट, महाराणा प्रताप पार्क, नीमवाडी, हिंगणा रोड येथे नदी घाटावर श्री गणेश विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भात स्थायी समिती सभापती सतीश ढगे व उपमहापौर राजेंद्र गिरी यांनी सुद्धा लक्ष देऊन तसेच या भागातील नगरसेवक लोकप्रतिनिधी यांनी भक्तांच्या सोयीसाठी व्यवस्था केली आहे.



भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर मंडळाच्या वतीने अकोट फाइल अशोक नगरच्या नागरिकांना तसेच आपातापा रोड या भागातील नागरिकांना सोय व्हावी, यासाठी  अकोट फाइल येथील हनुमान मंदिर समोर हनुमान चौकात गणेश मूर्ती विसर्जन कृत्रिम तलाव, निर्माल्य संकलन व्यवस्था  केली आहे. अध्यक्ष शंकर जयराज, नितीन राऊत, उपमहापौर राजेंद्र गिरी, नगरसेविका अर्चना चौधरी, उज्वल बामनेट, उमेश गुजर आदींच्या पुढाकाराने प्रभाग १,२,३ येथे गणेश भक्तांसाठी सुविधा निर्माण करण्यात येत आहे.


टिप्पण्या