- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मेजर ध्यानचंद जन्मदिनी फ्रिडम रनचे आयोजन
अकोला: स्व.मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन 29 ऑगस्ट रोजी क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांच्या जन्मदिनानिमित्त व्यायामाकरीता प्रोत्साहित करण्यासाठी Fit India अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन चळवळ राष्ट्रीय क्रीडा दिनापासून शनिवार(दि.29) ते दि. २ ऑक्टोबर पर्यंत राबविण्याचे येणार आहे.
याअंतर्गतखेळाडू , पुरुष, महिला, नागरिक, सर्व शैक्षणिक संस्था, विविध क्रीडा संघटना तसेच विविध क्लब इत्यादी सहभागी होऊ शकतात.
प्रत्येक जण धावण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तीशः अनुकूल वेळ निवडू शकतो. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊनही धावणे किंवा चालू शकणार आहेत. प्रत्येकास स्वत:च्या वेगाने धावणे किवा चालण्याची मुभा असणार आहे. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रेकिंग अप किंवा जीपीएस घड्याळचा वापर करुन धावलेल्या किंवा चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येणार आहे.
फिट इंडिया फ्रीडम रन मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील ऑनलाईन कार्यवाही करावी लागणार आहे. नागरीक खेळाडू, महिला, पुरुष,सर्व शैक्षणिक संस्था, विविध क्रीडा संघटना, विविध क्लॅब इ. सर्वांनी गुगल क्रोम फिट इंडियाच्या www.fitindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावचे अकाऊंट तयार करून लॉग इन करावे. अकाऊंट तयार करतांना नाव, ई-मेल, संपर्क क्रमांक, राज्य, जिल्हा इ. बाबी आवश्यक आहे, लाँग इन केल्यानंतर दिलेली माहितीमध्ये धावलेले किवा चाललेले अंतर, मॅराथॉनची माहिती फोटोसह अपलोडकरावी, नागरीक, खेळाडू, महिला, पुरुष यांनी आयोजक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला असे नमुद करावे व सर्व शैक्षणिक संस्था, विविध क्रीडा संघटना किवा विविध क्लॅब यांनी आयोजक म्हणून स्वत:चे नावासह माहिती अपलोड करावी.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा