Electricity bill:कोरोना काळातील वीजबिल शासनाने माफ करावे

कोरोना काळातील वीजबिल महाराष्ट्र शासनाने माफ करावे



आता अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल
आम आदमी पक्षाचा सरकारला इशारा 


अकोला: दिल्लीतील केजरीवाल सरकारने सर्व सामान्य वीज  ग्राहकांना नियमित 200 युनिट साठी वीज बिल माफ करणे शक्य आहे. तर महाराष्ट्र शासनाने किमान कोरोना काळातील 4 महिन्यांचे 200 युनीट पर्यंतचे वीज माफ करावे या मागणीसाठी आज सत्ताधारी पक्षाचे आमदार गोपिकीसन बाजोरिया आणि विपलव बाजोरिया यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन करून आता जर आम आदमी पक्षाची सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देणारे वीज बिल  महाराष्ट्र शासनाने माफ नाही केले तर अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा  आज देण्यात आला आहे.





राज्य शासनाने राज्यातील जनतेला दिलासा द्यावा यासाठी  कालच आम आदमी पक्षाचे अमरावती विभागीय  संयोजक शेख अन्सार यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार आज क्रांतिदिनी अकोल्यात रहिवासी आणि राज्य शासनामध्ये सत्तेतसहभागी असलेल्या शिवसेनेचे आमदार गोपिकीसन बाजोरिया,विपलव बाजोरिया यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केले यावेळी आमदार गोपिकीसन बाजोरिया यांनी  आम आदमी पक्षाच्या मागणीचे निवेदन स्वीकारून मागण्या रास्त असून मुख्यमंत्री ना  उध्दव ठाकरे  यांच्यासोबत बोलून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. 



 

यावेळी आम आदमी पक्षाचे अमरावती विभाग संयोजक शेख अन्सार,अकोला जिल्हा प्रभारी संयोजक अरविंद  कांबळे ,महानगर संयोजक प्रा खंडेराव दाभाडे पाटील ,सह संयोजक संदीप जोशी  गजानन गणवीर ,काजी लायक अली  सह आम आदमी पक्षाचे अनेक कार्यकर्ते  ठिय्या आंदोलनात उपस्थित होते.

टिप्पण्या