Electricity bill:सत्ताधारी पक्षाचे वीज बिल आणि बियाणे विरोधी आंदोलन म्हणजे स्वता:च्या सरकारच्या नाकर्तेपणाचे प्रमाणपत्रच - वंचित बहुजन आघाडी

सत्ताधारी पक्षाचे वीज बिल आणि बियाणे विरोधी आंदोलन म्हणजे स्वता:च्या सरकारच्या नाकर्तेपणाचे प्रमाणपत्रच - वंचित बहुजन आघाडी


अकोला दि. ६ : राज्यातील आघाडी सरकार मधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्याना त्यांच्या पक्षाची राज्यात सत्ता असल्याचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांनी बोगस बियाणे विरोधात आणि वीज बिल विरोधी आंदोलन केली आहेत.स्वपक्षाच्या मंत्री आणि सरकार विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच रस्त्यावर येत असल्यानेआघाडी सरकारला नाकर्तेपणाचे प्रमाणपत्रच बहाल केल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष  प्रमोद देंडवे ह्यांनी केली आहे.



जनतेने दिलेला जनादेश म्हणून आपले तत्व सोडून संधीसाधू पद्धतीने सत्तासाठी एकत्र आलेल्या सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला आता त्यांचे पक्षातील कार्यकर्त्यांनी घरचा आहेर दिला आहे.अकोलयात  बोगस बियाणे विरोधात काँग्रेसच्या युथ ब्रिग्रेड ने महाबीज मध्ये अधिका-याला घेरावा घातला होता.त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी चक्क कृषी विभागाच्या आवारात पेरणी केली होती.परवा काँग्रेसच्या मागासवर्गीय सेल ने वीज बिल कपाती साठी वीज कार्यालया समोर आंदोलन करीत वाढीव वीज बिलामध्ये कपातीची मागणी केली आहे.




विशेष म्हणजे काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वीज मंत्री नितीन राऊत हे काँग्रेसचं आहेत, हा विसरही काँग्रेसच्या पदाधिका-यांना पडल्याचे अकोल्यातील ही बोलके उदाहरणे आहेत.सत्तेतील पक्षांनी जनतेच्या हितासाठी सत्ता राबवायची असते.परंतु काँग्रेस राष्ट्रवादी पदाधिकारी रस्त्यावर उतरून अधिका-यांना न्याय मागत आहेत.त्यामुळे काँग्रेस सेना आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यात हसे होत आहे.आपुल्याच सरकार विरोधात त्यांच्याच पक्षाचे किंवा घटक पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून बोगस बियाणे आणि वाढीव वीज बिला विरोधात केलेली आंदोलने ही सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरल्याचे  सिद्ध करते.शेतक-यांच्या बांधावर बियाणे आणि खते पोहचविण्याच्या पोकळ घोषणा फोल ठरल्या आहेत.


 
आपल्याच सत्ते विरुद्ध रस्त्यावर आलेले कार्यकर्ते ह्यांनी  सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे दिलेले हे प्रमानीत केले आहे.तिन्ही पक्षाची  सरकारी यंत्रणा ही कुचकामी आणि निकामी असल्याचे ह्या आंदोलनाने सिद्ध केले आहे. कृषी आणि वीज मंडळ अखत्यारीत असलेल्या सेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे देण्याची गरज आहे सत्ताधा-यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणे ही त्या पक्षासाठी नामुष्कीची बाब आहे.आपलेच पक्ष घटक पक्ष म्हणून सत्तेत असून मंत्री आणि आमदारांना सांगून प्रश्न सोडविण्या ऐवजी  ह्याच पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करीत रस्त्यावर येणे हा सरकारच्या कार्यकर्तृत्वावर शिक्कामोर्तब करते.जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी हा स्टंट केला जात असल्याने तिन्ही घटक पक्षातील नेत्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना ट्रैनिंग देऊन आपल्याच सरकार विरोधात आंदोलन करण्याचा बालिशपणा आटोक्यात आणावा, अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केली आहे, अशी माहिती वंचितचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे ह्यांनी कळविले आहे.


टिप्पण्या