Dhargad Yatra:कोरोनाने रोखली शिवभक्तांची धारगड कडची वाट

कोरोनाने रोखली शिवभक्तांची धारगड कडची वाट  

सलग चवथ्या वर्षी शिवभक्तांसाठी धारगड यात्रेकरिता ना रेल्वे ना चांगला रोड



शिवभक्तांचे आराध्य दैवत श्री क्षेत्र धारगड यात्रेला दूरवरून भक्त हर हर बोला महादेवाच्या गजरात दाखल होतात. अकोला मधून हजारो शिवभक्त  श्रावण महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी श्रीक्षेत्र धारगड येथे श्री महादेवाचा यात्रा महोत्सव करीता जात असतात.


अकोला: अकोट मीटर गेज रेलवेच्या टपावर बसून शिवभक्त प्रवास करायचे.  मीटर गेज चे ब्रॉड गेज मधे रूपांतर करण्यासाठी या मार्गावर २०१७ पासून काम सुरू होते. 




नुकतेच अकोला - अकोट या रेलवे मार्गाचे ब्रॉड गेज मधे रूपांतर होऊन चाचणी सुध्दा झाली.  परंतु कोरोना मुळे या मार्गावर प्रवाशी रेलवे सुरू होऊ शकली नाही. तसेच अकोट ते खंडवा रेल्वे मार्गाचे काम सुद्धा रखडले आहे. त्यामुळे रेल्वे सुरु जरी झाली तरी ती अकोट पुढे जाणार नाही.  



अकोट ते खंडवा रेल्वे मार्ग लवकर पूर्ण व्हावा व ओंकारेश्वर, उज्जैन करीत या मार्गावरून थेट रेल्वे सुरु करावी अशी मागणी शिवभक्तांनी व प्रवाश्यांनी केली आहे. 


टिप्पण्या