Corona virus:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना विषाणूचा संसर्ग Union Home Minister Amit Shah infected with corona virus

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना विषाणूचा संसर्ग


भारतीय अलंकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.शहा यांनी स्वत: आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्वीट करुन याची माहिती दिली. "कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यानंतर मी कोरोना टेस्ट करुन घेतली आणि कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपली टेस्ट करुन घ्यावी,"असे अमित शहा यांनी लिहले आहे.




दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होता. कोरोना प्रादुर्भाव रोखण्या साठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अमित शहा हे स्वत: लक्ष घालत आहे. अमित शहा यांनी प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर आणि संबंधितांसोबत बैठका घेवून कोरोना चाचण्या वाढवल्या आणि इतरही महत्वाची पाऊले उचलली होती. या सर्वांनंतर दिल्लीतील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे.मात्र आता कोरोना राजकीय वर्तुळात शिरल्याचे होत आहे.


 


राजकीय नेत्याना कोरोना

काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला होता. शिवराज सिंह चौहान यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता ठीक असून कोविड टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. शिवराज सिंह चौहान यांनी सुद्धा ट्वीट करुन आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड,अशोक चव्हाण यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता.कोरोनासोबतची लढाई या नेत्यानी जिंकली आहे.




टिप्पण्या