Corona virus news:आज दिवसभरात ५५ पॉझिटीव्ह; ४६३ घेताहेत उपचार: एकूण २८८० कोरोनाग्रस्त

आज दिवसभरात ५५ पॉझिटीव्ह; ४६३ घेताहेत उपचार: एकूण २८८० कोरोनाग्रस्त



अकोला,दि. ६: आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३२४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २६९अहवाल निगेटीव्ह तर  ५५ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या २८८०(२४३९+४४१) झाली आहे. आज दिवसभरात १८ रुग्ण बरे झाले. आता ४६३ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २०९८३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २०३९२फेरतपासणीचे १६७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  ४२४  नमुने होते. आजपर्यंत एकूण २०८९५ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १८४५६   आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २८८०(२४३९+४४१)आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



आज ५५ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात ५५जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातआज सकाळी ४१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात २३ महिला व १८ पुरुष आहेत. त्यात अकोट येथील १२आगर ता. अकोला येथील सातशास्त्रीनगर सहासिंधी कॅम्प चारपुनोती ता. बार्शीटाकळी येथील तीन तर रामनगरकौलखेडशिवनीवाशीम बायपासजुना कॉटन मार्केटगणेश नगरगोरक्षण रोडडाळंबी ता. अकोला व सांगवा मेळ ता. मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात नऊ महिला व पाच पुरुष आहेत. त्यात वाडेगाव येथील नऊरिधोरा येथील तीन तर पुनोती ता. बार्शी टाकळी येथील दोन जण याप्रमाणे रहिवासी आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



दरम्यान काल(दि.५) रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड ॲन्टीजेन चाचणी अहवालात २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.



 

१८ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० मुर्तिजापुर उपजिल्हा रुग्णालयातून दोनआयकॉन हॉस्पिटल येथून तीन व ओझोन हॉस्पिटल येथून तीन  अशा १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाअशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.



४६३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या २८८०(२४३९+४४१) आहे. त्यातील  जण ११३ मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  २३०४ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ४६३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.




रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात ४०२ चाचण्या, १० पॉझिटिव्ह

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ४०२ चाचण्यामध्ये १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.



आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- 

अकोलाग्रामिणपातूर, तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाहीत.  अकोट येथे ५७ चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. बाळापूर येथे १३ चाचण्या झाल्या त्यात एकही जण पॉझिटीव्ह आला नाही

बार्शीटाकळी येथे  दोन चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे २१५ चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  तसेच अकोला मनपामध्ये ७९  चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ३६ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचण्या झाल्या नाही, असे एकूण ४०२ चाचण्या होऊन त्यात १० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात ९०६० चाचण्या झाल्या असून ४५७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


कोविड १९ बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा: रॅपिड टेस्टसाठी ग्रामपातळीवर नियोजन करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. तथापि, ज्या गावात कोरोना बाधितांची संख्या व कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे, तसेच ज्या गावांत रॅपिड टेस्टसाठी  काही कारणाने लोकांचा प्रतिसाद मिळालेला नाही अशा गावांमध्ये पुन्हा रॅपिड टेस्ट घेण्यासाठी ग्रामपातळीवर नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज सर्व उपविभागीय अधिकारी ,तहसिलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले.



कोविड १९ संदर्भात आज जिल्ह्यास्तरीय आढावा घेण्यात आला. सकाळच्या सत्रात जिल्हाधिकारी पापळकर यांनी त्यांच्या दालनात आढावा घेतला. त्यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा परिषदेचे अति मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. सुभाष पवार,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिक्षक डॉ.मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख तसेच ओझोन व आयकॉन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारीही उपस्थित होते.



तसेच दुपारच्या सत्रात झुम प्रणालीद्वारे सर्व सर्व उपविभागीय अधिकारी ,तहसिलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांचीही आढावा बैठक घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले आदी उपस्थित होते.



साधनसामुग्री व औषधीसाठ्याचा आढावा

            कोवीड रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्री व औषधी साठ्याबाबत आढावा घेण्यात आला. रुग्णांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात याव्या.  रुग्णालयात  कोवीड वार्डात होत असलेल्या उपचार व व्यवस्थेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निरीक्षण ठेवावे, असेही निर्देश देण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डायलिसीस युनिट कार्यान्वित करावे, तसेच खाजगी रुग्णालयांनीही डायलिसीस सुविधा रुग्णांना  उपलब्ध करुन द्याव्या, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.



आधारकार्ड व शिधा पत्रिका आवश्यक

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णास उपचारासाठी दाखल करतांना रुग्णासोबत आधार कार्ड व त्याची शिधापत्रिका सोबत अवश्य द्यावी. त्यामुळे रुग्णांना महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देणे शक्य होते. रुग्णाच्या निकटवर्तीयांनी ही काळजी अवश्य घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.



ग्रामपातळीवर रॅपिड टेस्टचे नियोजन करा

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विशेषतः पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहेत. तथापि, काही गावांमध्ये नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा रॅपिड टेस्ट करण्यासाठी गावात असलेली बाधितांची संख्या,मृत्यूची संख्या व प्रतिसाद कमी असलेल्या ठिकाणी टेस्ट घेण्यात याव्या. यासाठी सरपंच,पोलीस पाटील, कोतवाल, आशा स्वयंसेविका, शिक्षक व तलाठी यांच्या ग्रामस्तरीय समितीने पुढाकार घ्यावा. ज्या दिवशी चाचण्या करावयाच्या असतील त्याआधी त्या गावास गटविकास अधिकारी, तहसिलदार इ. अधिकाऱ्यांनी भेटी देऊन ग्रामस्थांना आवाहन करावे,असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.


टिप्पण्या