BJP:भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूरच्या पाठपुराव्याने ३७७ शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पीक कर्ज वाटपाचा प्रश्न सुटला

भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूरच्या पाठपुराव्याने  ३७७ शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पीक कर्ज वाटपाचा प्रश्न सुटला


अकोला: दि.अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूर्तिजापूर मार्फत शेतकऱ्यांना खरीप सन २०२०पीक कर्ज वाटप करण्यात आला. परंतु बँकेचे ठरवलेले उदिष्ट पूर्ण झाले असे सांगून कर्ज वाटप थांबवण्यात आला. यामुळे ३७७ शेतकऱ्यांचे खरीप पीक कर्ज वाटप रखडलेले होते. आमदार हरीष पिंपळे यांच्या मार्गदर्शनात व  भूषण कोकाटे ( भाजपा तालुकाध्यक्ष मूर्तिजापूर),  अनिल ठोकळ (शेतकरी आघाडी), यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या पाठपुराव्याने जिल्हा बँकेच्या वरिष्ठ निरिक्षक आवारे यांच्याशी २० ऑगस्ट रोजी या विषयावर चर्चा झाली असता, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी  बोलून याचा पाठपुरावा करतो, असे सांगितले व आज २४ ऑगस्ट रोजी पुनःश्च चर्चा झाली असता, त्यांनी भाजपाच्या  मागण्या मान्य करून ३७७ शेतकऱ्यांचा खरीप पीक कर्ज वाटपाचा प्रश्न निकाली लावला व  त्वरित कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले.



यावेळी भूषण कोकाटे (भाजपा तालुकाध्यक्ष), बाबुभाऊ देशमुख (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष), राजेंद्र इंगोले तालुका उपाध्यक्ष, अनिल ठोकळ (शेतकरी आघाडी अध्यक्ष)प्रमोद टाले तालुका सरचिटनिस ,शेतकरी संजय वैद्य ,शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गुलाबराव पाटील महसाये ,जबी खान अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष,दिवाकर काटे हे उपस्थित होते.


टिप्पण्या