- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
त्या बोगस पोलिसावर कारवाई करा अन्यथा स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण करणार
माजी पं स. सदस्य तथा प्रजाशक्ति जनहितार्थ संघर्ष समिती,अकोलाचे अध्यक्ष विशाल पाखरे यांचा इशारा
अकोला : लॉकडाऊनच्या काळात सतीष
श्यामराव सिरसाट याने स्वतःला एम.आय.डी.सी.पोलीस असल्याचे सांगत लोकांवर अन्याय,अत्याचार केला व लोकांना नाहक त्रास दिल्यामुळे त्यांचेवर जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे स्तरावरुन कार्यवाही करावी, अन्यथा स्वातंत्र्य दिनी १५/०८/२० रोजी त्याच बोगस पोलीस विरोधात कार्यवाही करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदना द्वारे विशाल पाखरे यांनी दिला होता. मात्र,यावर अद्यापही कारवाई झाली नसल्याने विशाल पाखरे हे शनिवार पासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.
गेल्या मार्च मध्ये अकोला जिल्हामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता लॉकडाउन सुरु केले होते व सध्याही चालु आहे. अशा परिस्थीतीमध्ये एम.आय.डी. सी. पोलीस स्टेशन अंतर्गत काही पोलीस कर्मचा-यांच्या डयुटी सुरु असतांना त्यांचे सोबत सतीष श्यामराव सिरसाट याने स्वत:ला पोलीस कर्मचारी दाखवुन गोरगरीब जनतेवर अन्याय अत्याचार करुन, त्यांना मेडीकल व दवाखाण्यामध्ये जाण्यास मज्जाव केला होता. व न्यु अशोक वाटिका, शिवणी जवळ हायवेवर सतीष श्यामराव सिरसाट हा रस्त्याच्या मधोमध उभे राहुन व हातामध्ये पोलीसाचा दांडा घेवुन लोकांना मारण्याचा प्रयत्न सुध्दा केलेला आहे. यावर एम.आय. डी.सी. कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या निदर्शनास ही बाब आणुन देवुन सुध्दा त्यानी
सतीष श्यामराव सिरसाट याचेवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता व कुठल्याही प्रकारचा मज्जाव न करता त्याला खुलेआम पोलीस स्टेशनमध्ये वावरण्याची सुट देल्याचे दिसुन येत आहे. स्वत:च्या टु व्हीलर गाडीला पोलीसांचा दांडा वापरून सध्या परिस्थीतीमध्येही तो गावामध्ये वावरत आहे.
लोक चोरुन गायीचे मांस विकतात व जे लोक दररोज अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करता अशा लोकांजवळुन तो हप्ता वसुली करून त्याच्या निकटवर्तीय पोलीस कर्मचा-यांना तो ती रक्कम पुरवितो. म्हणुन काही कर्मचारी सतीष श्यामराव सिरसाटला स्वत:च्या गाडीवर एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणा-या हद्दीमध्ये घेवुन फिरतात. म्हणुन जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे कडून सतीष श्यामराव सिरसाट यांनी विरोधात कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा या मागणीकरीता दि.१५ ऑगष्ट २०२० रोजी माजी पं स सदस्य विशाल पाखरे हे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करणार आहे. आमरण उपोषण करीत असतांना उपोषण कर्त्याचे शरीराचा कोणताही अवयव निकामी झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे . याबाबतचे निवेदनची सत्यप्रत गृहमंत्री अनिल देशामुख यांना माहिती साठी पाठविल्या आहेत,असे पाखरे यांनी सांगितले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा