विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षा येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याची तज्ञ समितीची शिफारस
नवी दिल्ली: विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेतल्या जाव्यात ही तज्ञ समितीची शिफारस, विद्यापीठ अनुदान आयोगानं मान्य केली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, विद्यापीठांच्या परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रका बाबत शिफारशी करण्यासाठी, आयोगानं या वर्षी एप्रिलमध्ये एक तज्ञ समिती नेमली होती. या समितीनं एप्रिल मध्ये जाहीर केलेल्या आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करून, आपल्या नव्या शिफारसी आयोगाकडे पाठवल्या आणि आयोगानं त्या मान्य केल्या आहेत.
त्यानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत, ऑफलाइन म्हणजे पेन आणि उत्तरपत्रिकांचा वापर करून किंवा ऑनलाईन म्हणजे संगणकीय प्रणालीचा वापर करून किंवा ऑनलाइन-ऑफलाइन अशा संमिश्र मार्गांनी घेता येणार आहेत.
इंटरमिजिएट म्हणजे मधल्या सत्राचं मूल्यांकन मात्र आधीच्याच मार्गदर्शक सुचनांनुसार, याआधीच्या परीक्षांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारावर होणार आहे
.........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा