Tree plantation:अजित पवारांच्या वाढदिवशी पाचशे झाडं लावण्याचा शुभारंभ

अजित पवारांच्या वाढदिवशी पाचशे झाडं लावण्याचा शुभारंभ
अकोला: प्रदूषणाच्या वाढत्या स्तरामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे, वृक्षरोपणा मुळे पर्यावरण समतोल राखला जातो. वृक्षारोपणाचे सामाजिक, वैयक्तिक आणि आर्थिक स्तरावर फायदे असुन वृक्षारोपण व संवर्धन खुप महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन माजी अध्यक्ष विदर्भ वैधानिक विकास मंडळ तथा माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपणाच्या  कार्यक्रम प्रसंगी केले. 

कुंभारी येथील श्री गणेश कला  महाविद्यालयाच्या प्रांगणा अजित  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  संस्थेच्या महाविद्यालयाच्या परिसरात 500 कडूलिंबाचे वृक्षारोपण करून त्यांचे पूर्णता संवर्धन करण्याचा संकल्प  तुकाराम बिडकर यांनी आजच्या या शुभ दिनी केला. 

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. व्ही.मेहरे ,संस्थेचे उपाध्यक्ष आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण बिडकर गुरुजी व प्रा. डॉ. प्रभाकर मोहे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप ढोमणे, भिमराव तायडे, सिताराम पवार, संजय ढोले यांनी अथक परिश्रम घेतले.
.........

टिप्पण्या