Tree plantation:जय बजरंग व्यायाम शाळेचा वर्धापनदिन वृक्षलागवडीने केला साजरा

जय बजरंग व्यायाम शाळेचा वर्धापनदिन वृक्षलागवडीने  केला साजरा

मुलींच्या व्यायामशाळेचा ४२ वा वर्धापनदिन

हिंगणा-कुंभारी:जय बजरंग मंडळ द्वारा स्थापित जय बजरंग मुलींच्या व्यायाम शाळेचा वर्धापन दिवस कार्यक्रम हनुमान गोरक्षण संस्था,हिंगणा-कुंभारी येथे संस्थेचे संस्थापक माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड यांच्या शुभहस्ते वृक्षलागवड करून साजरा केला.


वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता प्राचार्य डॉ किसन मेहरे, प्रा अशोक भराड , डॉ प्रभाकर मोहे, पंकज फाले, प्रविण वाघमारे, सचिन बिरकड, मुलचंद राठोड, सीताराम शिंगाडे, रवि कल्याणकर,चंद्रकांत बिरकड,निलेश पवार, द्वारकानाथ चिलवंते, सतिष शिरसाठ, योगेश डाबेराव व सुधिर वानखडे उपस्थित होते.

याप्रसंगी प्रा. बिडकर यांनी  जय बजरंग मंडळ, मुलांची व मुलींच्या व्यायामशाळे बद्ल माहीती दिली.अकोला जिल्ह्यातील कुंभारी या एक हजार लोकसंख्येच्या गावात ३ जुलै १९७८ रोजी जय बजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष नारायणराव गावंडे यांच्या प्रेरणेतून राज्यातील ग्रामीण भागातील पहिल्या मुलींच्या व्यायाम शाळेची स्थापना कुंभारी येथे केली. आज रोजी विदर्भातील पाच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये मुलीच्या व्यायाम शाळा कार्यरत आहेत. 

अनेक सामाजिक उपक्रमांबरोबर, क्रीडा क्षेत्रात या संस्थेने खूप नाव कमावले. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, तथा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या संस्थेच्या मुलींनी विविध स्पर्धेत मजल मारली. त्यापैकी कमल गावंडे  (फ्रान्स, इटली, इंग्लंड)  बेबी  अतकरे (रशिया,फिनलॅड ) कु.अश्विनी खोपे ( दक्षिण आफ्रिका ) सुषमा नागरे (अमेरिका)  यांनी  आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सव व महिला मेळाव्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. आज मुलीच्या व्यायाम शाळेचा ४२ वा वर्धापन दिवस. यानिमित्ताने व्यायाम शाळेच्या आजी-माजी विद्यार्थिनींना हार्दिक शुभेच्छा. तथा या संस्थेसाठी तन-मन-धनाने सहकार्य करणाऱ्या सर्वांचे बिरकड यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा अशोक भराड, डॉ प्रभाकर मोहे, प्रा दिलीप चव्हाण, पंकज फाले आदींसह संस्थेच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या