School education:नापास विद्यार्थ्यांनाही दहावी-बारावीत प्रवेशाची संधी, व्हिडिओद्वारा तोंडी परीक्षा होणार

नापास विद्यार्थ्यांनाही दहावी-बारावीत प्रवेशाची संधी, व्हिडिओद्वारा  तोंडी परीक्षा होणार

                             संंग्रहीत छायाचित्र


राज्य सरकारने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरात झालेल्या सर्व परिक्षांमधील गुणांची सरासरी अनुसार दहावी आणि बारावीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामध्ये काही विद्यार्थी नववी आणि अकरावीच्या वर्षभरातील परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक संधी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा व्हिडीओ कॉल द्वारा घेण्यात येईल.


मुंबई : नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना देखील आता दहावी आणि बारावीत प्रवेश मिळू शकतो. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत गुरुवारी आपल्या ट्विटर हॅन्डल द्वारा घोषणा केली आहे. “जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांना तोंडी परीक्षेची संधी देण्यात येईल. ही तोंडी परीक्षा व्हिडीओ कॉल किंवा वर्गात थेट उपस्थितीत पार पडेल, असे यामध्ये वर्षा गायकवाड यांनी म्हंटले आहे. 


कोरोना विषाणू महासंकटाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्या. राज्य सरकारने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरात झालेल्या विविध परीक्षांमधील गुणांच्या सरासरीनुसार त्यांना दहावी आणि बारावीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही विद्यार्थी नववी आणि अकरावीच्या वर्षभरातील परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीत प्रवेश मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर शिक्षण विभागाने उपाय शोधून काढला आहे.

"नववी आणि अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊन त्यांना पुढील वर्गात जाण्याची संधी दिली जाईल. तोंडी परीक्षेसाठी व्हिडीओ कॉल किंवा थेट उपस्थितीचा पर्याय आहे, असा निर्णय शिक्षण विभागाकडून गुरुवार,२३ जुलै  रोजी घेण्यात आला आहे." वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर अशी माहिती दिली.


.........



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा