Prahar:तहसीलदार, बांधकामला 'प्रहार'चा इशारा वडनेर-उमरी रस्ता करण्याची मागणी : अन्यथा तीव्र आंदोलन

तहसीलदार, बांधकामला 'प्रहार'चा इशारा 
वडनेर-उमरी रस्ता करण्याची मागणी : अन्यथा तीव्र आंदोलन 
दर्यापूर: तालुक्यातील वडनेर गंगाई येथील वडनेर उमरी रस्ता पावसाने चिखलमय झाला आहे. हा रस्ता करण्याच्या मागणीसाठी प्रहार पक्षचे आकाश घटाळे यांनी बेशरमचे झाडे लावून निषेध नोंदविला होता. त्यानंतर आता घटाळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसीलदार यांना गंभीर इशारा देत रस्ता तयार करण्याची मागणी केली. अन्यथा आपण उपोषण छेडू,अशी तंबीही त्यांनी दोन्ही विभागाला दिली आहे. 

अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर तालुक्यातील वडनेर गंगाई येथून उमरीला जाण्यासाठी जुना रस्ता आहे. तीर्थक्षेत्र लखमाजी महाराज संस्थान बाग याच मार्गावर आहे. त्यामुळे भाविकांची व शेतकऱ्यांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता प्रस्थापित सत्ताधार्‍यांच्या गंभीर अनास्थेमुळे तयार करण्याकडे दुर्लक्ष झाले. याच मार्गावर बोर्डी नदी आहे. पावसाळ्यात बोर्डी नदी दुथडी भरून वाहते. त्यामुळे मोठा पूर जातो. पर्यायाने मार्ग चिखलमय होतो. शेतकऱ्यांना शेतात साहित्य ने -आण करण्यासाठी मरण यातना सहन कराव्या लागतात. शिवाय शेती पीक घरी कसे आणावे, हा गंभीर प्रश्नही निर्माण होतो. ही बाब लक्षात घेता प्रहारच्या आकाश घटाळे यांनी गत काही दिवसापूर्वी शेतकरी पुत्रांसह बोर्डी नदीच्या तीरावर धाव घेत येथे बेशरमचे झाड लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर हा मुद्दा घटाळे यांनी तालुका पातळीवर नेत तहसीलदार व बांधकाम विभागसमोर ठेवला गेला.  

यावर कुठलाही तोडगा काढला नाहीतर आपण गंभीर उपोषण छेडू,असा दमही त्यांनी तहसीलदार योगेश देशमुख यांना भरला आहे.
........

टिप्पण्या