power distribution:तिवसा शहरातील आनंदवाडी वस्तीची विज वितरण समस्या अखेर निकाली The power distribution problem of Anandwadi in Tivasa city has finally been resolved

तिवसा शहरातील आनंदवाडी वस्तीची विज वितरण समस्या अखेर निकाली

नगराध्यक्ष वैभव वानखडे यांच्या प्रयत्नाची फलश्रुती

तिवसा:तिवसा (अमरावती) शहरातील आनंदवाडी प्रभाग १ व ३ ही वस्ती सुमारे ३५ वर्षांपासून वसली आहे. या वस्तीत मात्र सातरगाव येथील ग्रामिण फीडरवर विज वितरण आजवर होत आले.
परंतु, एवढ्या मोठया परिसराचा भार एका रोहित्रावर असल्याने आनंदवाडी येथील नागरीक विजेचा लपंडाव, लाईन मंद होणे, वीजचोरी, लोडशेडिंग, आणि ग्रामीण-शहर या वादात अडकले होते.

यांसदर्भांत नागरीकांची गैरसोय व मागणी बघता विज वितरण कंपनीशी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी पत्रव्यवहार केला तांत्रिक आणि वनविभागाची भौगोलिक अडचण समजून घेत यासंदर्भात पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा शैलेश नवाल, अधिक्षक अभियंता श्रीमती गुर्जर, कार्यकारी अभियंता श्री ढोके व तिवसा शहर अभियंता श्री बोन्द्रे यांच्याकडे सतत पाठपुरावा करत या भागात विज वितरण व्हावे व ते  तिवसा शहर फिडरवर व्हावे यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून आवश्यक असलेला २९ विद्यूत पोल व रोहित्र याचबरोबर शेख फरीद बाबा टेकडी, हिंदू-बौद्ध स्मशानभूमी , मुस्लिम कब्रस्थान येथे सुद्धा विज वितरण व्यवस्था नव्हती अशा या सर्व कामासाठी सुमारे १५:०० लक्ष रु. चा निधी मंजूर करून घेत, पालकमंत्री ना.यशोमती ठाकूर , वनमंत्री ना संजय राठोड यांच्या समवेत वनविभागाच्या अधिकारी समवेत मुंबई येथील बैठकीत परिस्थिती मांडून आलेली हद्दीची अडचण व सीमांकण बाबत चर्चा करून हा प्रश्न निकाली काढला.

यामुळे अनेक वर्षांपासून असलेली मागणी निकाली लागल्यामुळे आनंदवाडी येथील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले.  या रोहित्राचे लोकार्पण १७ जुलै रोजी लॉकडाऊनचे नियम पाळत नगराध्यक्ष जि नि स सदस्य वैभव वानखडे, कनिष्ठ अभियंता श्री बोन्द्रे ,नगरसेवक दिवाकर भुरभुरे, नगरसेविका सौ संध्या पखाले, किसन मुंदाणे, संदीप दहाट, अजीम शहा, अभिलाश पखाले, श्री गुल्हाने, रोशन गवळी व नागरीक व महिला उपस्थित होते.
.........

टिप्पण्या