PM Awaas Yojna:रमाई, शबरी, पारधी व प्रधानमंत्री घरकुल योजेनचा निधी तातडीने मंजूर करा - वंचित बहुजन आघाडी Ramai, Shabari, Pardhi and Pradhan Mantri Gharkul Yojana funds should be sanctioned immediately - Vanchit Bahujan Aghadi

रमाई, शबरी, पारधी व प्रधानमंत्री घरकुल योजेनचा निधी तातडीने मंजूर करा - वंचित बहुजन आघाडी


अकोला, दि. १७: राज्यातील रमाई, पारधी, प्रधानमंत्री आणि शबरी घरकुल योजनेतुन घरे मंजूर झालेल्या अनुसूचित जाती, जमाती,आदिवासी भटक्या तसेच  दारिद्रय रेषे खालील लाभार्थ्यांची घरे उर्वरित निधी अभावी अर्धवट आहेत.काही ठिकाणी पहिला हप्ता  ठिकाणी दुसरा तिसरा हत्याची प्रतीक्षा सुरु आहे. कोरोनाचे चार महिने टाळेबंदी मुळे रोजगार हिरावला गेला आहे. ऐन पावसाळ्यात लाभार्थीची घरे अर्धवट असल्याने उघड्यावर संसार घेऊन जगावे लागत आहे.आर्थिक आणिबाणी व लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.त्यामुळे सर्व घरकुल योजनेचा निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी वंचित बहूजन आघाडी कडून प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

रमाई घरकुल, शबरी घरकुल, पारधी घरकुल व प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी महाराष्ट्रभर गरीब व वंचित लाभार्थी यांना घरे मंजूर आहेत. पहिल्या दुसऱ्या टप्प्यात लाभार्थीना निधी दिला आहे. त्यामुळे लाभार्थीनी आपआपल्या झोपड्या तोडून घरे बांधायला घेतली आहेत. ऐन ऊन्हाळ्यात घराची कामे सुरु झाली.त्या नंतर कोरोनाचे संकट निर्माण झाले व लॉकडाऊन मुळे बेरोजगार व्हावे लागले.गेली चार महिने ऊर्वरित निधी मंजूर होत नसल्याने घरकुलांचे कामे रखडली आहेत. योजनेतील अनेक लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासना कडून सुरुवातीला काही रक्कम अदा करण्यात आलेली आहे. उर्वरित निधी येणे पूर्णपणे बंद झाल्याने महाराष्ट्रात गोर गरीबांची बांधकाम अर्धवट आहेत.

या योजनेचा दुसरा हप्ता, तिसरा तर काही ठिकाणी अंतिम हप्ता लाभधारकांना न मिळाल्याने ते चिंतेत आहेत.पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला आहे. कोरोनाचे संकट डोक्यावर असलेलया महाराष्ट्रातील ह्या वंचित समूहाचे संसार उघड्यावर आहेत.ह्याची दखल घेऊन तातडीने घरकुल लाभार्थीना निधी मंजूर करणे गरजेचं आहे.तातडीने घरकुल योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचा उर्वरित संपुर्ण निधी एकरकमी मंजूर होणे गरजेचं आहे.तसे निर्देश संबंधित विभागांना देण्यात येऊन रमाई, शबरी, पारधी व प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल योजना निधी पावसाळ्यापुर्वी पूर्ण होऊन गोरगरिबांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यात यावे अशी अशी मागणी राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
........



टिप्पण्या