त्या अनाथाचा अंतिम विधी केला महेंद्र डोंगरे आणि सहकाऱ्यांनी ! Mahendra Dongre and his colleagues performed the last rites of that orphan!

त्या अनाथाचा अंतिम विधी केला महेंद्र डोंगरे आणि सहकाऱ्यांनी !

भारतीय अलंकार
अकोला: सध्या कोरोना रोगाच्या दहशतीमुळे आप्त स्वकीय सुध्दा अंतिम विधी करण्यासाठी समोर येत नाहीत.  त्यामुळे कोरोनाची दाहकता अधिक गडद होत आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या अंतिम विधीला उपस्थित राहणाऱ्यांना कोरोना होण्याची शक्यता अधिक असल्याने कुणीही या कामासाठी पुढे येत नाही. मात्र, प्रबुद्ध भारत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे आणि त्यांचे कार्यकर्ते  अश्या कामासाठी बिनदिक्कत समोर येण्यासाठी तयार असल्याचे दस्तुरखुद्द महेंद्र डोंगरे यांनी सांगितले. तसेच अनाथांचा अंतिम विधी करण्यासाठी आम्ही तयार असून संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व सामान्य नागरिकांना डोंगरे यांनी केले आहे .

तारफाईल भागातील  सिद्धार्थवाडी येथील निराधार व्यक्तीचे निधन झाले असता, अंतीम संस्कार करण्याला कोणीच पुढे  आले नसल्याने  महेंद्र डोंगरे यांनी   पुढाकार घेतला. माणुसकीच्या नात्याने  चंद्रशेखर नकाशे, सोनु वासनिक, सिद्ध डोंगरे, सचिन खोब्रागडे, राजू रामटेके, मुकेश खोबरागडे, मारुती वासनिक,गितेश सोनटक्के,आकाश शेंडे ,संदेश मेश्राम ,प्रतीक मेश्राम ,सागर वानखडे, अमोल ओके ,प्रथमेश मडामे ,सुरज मेश्राम, शिवा वासनिक, बिट्टू मंडे, राहुल गोराण, अंकित मेश्राम, तेजस बाभुळकर, कपिल मेश्राम, आर्यन मेश्राम, मनीष रामटेके, प्रज्वल मेश्राम, यश बोरकर ,दीक्षांत गजरे, प्रशिक मेश्राम ,अंकित मेश्राम, रवी गवई, अक्षय सहारे, सनी डोंगरे ,कुणाल डोंगरे, आशिष मेश्राम, संमेक वाकोडे या  कार्यकर्ते यांनी सर्व विधी पूर्ण केल्या. डोंगरे यांनी मुखाग्नी दिला.

भविष्यात अशी घटना घडल्यास, निराधार असतील आणि त्यांचा काही कारणास्तव मृत्यू झाला असेल तर त्यांचा अंतिम संस्कार पूर्ण  करण्याची जबाबदारी घ्यायला डोंगरे आणि त्यांचे सहकारी तत्पर आहेत. यासाठी नागरिकांनी संपर्क साधून माहिती द्यावी,असे आवाहन डोंगरे यांनी केले आहे.
.........

टिप्पण्या