lockdown:लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या आटोरिक्षा चालक व मालकांचा शासनाने प्राधान्याने विचार करावा -मोहम्मद बदरूज्जम्मा

लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या आटोरिक्षा चालक व मालकांचा शासनाने  प्राधान्याने विचार करावा -मोहम्मद बदरूज्जम्मा

Autorickshaw drivers and owners affected by lockdown should be given priority by the government: Mohammad Badrujamma

आधीच बेरोजगार असलेल्या आटो चालक - मालक यांनी आपली जमीन विक्री करून किंवा बँक कर्ज काढून आटो रिक्षा खरेदी करून आपला संसार चालवित आहेत. मात्र,  लॉकडाऊनमुळे  त्यांच्या कुटुंबावर  उपासमार  होत आहे. याच नैराश्यातुन राज्यात ९ लोकांनी आपली जीवनयात्रा  संपवून जगाचा निरोप घेतला.


अकोला : महाराष्ट्र शासनाने गेल्या १२ एप्रिल पासून कोरोना महामारीवर  नियंत्रण मिळविण्यासाठी  राज्यात लॉकडाऊन जाहीर केला. तेंव्हा पासूनच राज्यातील आटो रिक्षांची चाके थांबलेली आहेत.  अश्या परिस्थितीमध्ये आटोरिक्षा चालक मालक  आपल्या संसाराचा गाडा कसा हाकत असतील, याचा  राज्यशासनाने सहानुभूती पूर्वक विचार करावा,अशी मागणी शासनाकडे करण्यासाठी आणि राज्य सरकारचे आटो चालक व मालक यांचेकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी राज्यभर महाराष्ट्र असंघटित कामगार  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद बदरूज्जमा यांचे नेतृत्वाखाली लाईव्ह आंदोलन करण्यात आले.

  
राज्य शासनाने गेल्या ५ जून पासून  राज्यात अनलॉक प्रक्रिया हळूहळू सुरू केली आहे. मात्र, या प्रक्रियेत आटो चालक मालक यांचा विचार करण्यात आला नाही.  त्यातच आटो रिक्षा धारकांना  प्रवासी वाहतूक करण्यासाठी जाचक अटी लागू  केल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीस प्रतिबंध झाला असला तरीही आटो रिक्षा चालकांचे संसाराचे गाडे चालविण्यासाठी सुध्दा प्रतिबंध लागला आहे.आधीच बेरोजगार असलेल्या आटो चालक - मालक यांनी आपली जमीन विक्री करून किंवा बँक कर्ज काढून आटो रिक्षा खरेदी करून आपला संसार चालवित आहेत. मात्र,  लॉकडाऊनमुळे  त्यांच्या कुटुंबावर  उपासमार  होत आहे. याच नैराश्यातुन राज्यात ९ लोकांनी आपली जीवनयात्रा  संपवून जगाचा निरोप घेतला. त्यांचे  कुटुंबीय उघड्यावर पडले आहे. त्यामुळे अश्या आत्महत्या मध्ये भर पडू नये, यासाठी महाराष्ट्र आटो चालक-मालक यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचे हक्क अबाधित राहावे, यासाठी अकोल्यात स्वराज्य भवन येथे दुपारी १२ ते ४ या वेळात लाईव्ह आंदोलन मोहम्मद बदरूज्जमा  यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.  

मोहम्मद बदरूज्जमा  यांच्या नेतृत्वाखाली  आज राज्यभर लाईव्ह आंदोलन करून  जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करून शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी जिल्हा काँग्रेस महासचिव प्रकाश तायडे , युथ काँग्रेस अध्यक्ष महेश गणगणे, मनपा विरोधी पक्षनेते साजीदखान पठाण , एन एस यु आय अध्यक्ष आकाश कवडे, उदय देशमुख, जिल्हाध्यक्ष  प्रदीप नारे, जिल्हा महासचिव संतोष शर्मा, मो सादिक मो शब्बीर, शुभम तिडके, शाफिक सिद्दीकी रहीम, शाहिद अ रज्जक ,आटो युनियनचे अश्फाक लीडर, नासीर खान शेर खान , हुसैन लीडर, इलियास खान लोधी,  सह आटो रिक्षा चालक  मालक  संघटनेचे  अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
.........

टिप्पण्या