Lockdown news:अकोलेकरांचा Lockdown ला 100% प्रतिसाद

अकोलेकरांचा Lockdown ला 100% प्रतिसाद


नीलिमा शिंगणे-जगड

अकोला:कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी अकोला जिल्ह्यात तीन दिवसांचा Lockdown घोषित केला आहे. शनिवार 18 जुलै रोजी पहिल्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. Lockdown चा पहिला दिवस 100% यशस्वी झाला.शहरातील संपूर्ण रस्ते निर्मनुष्य होते.


कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता,या विरुद्धच्या लढा अधिक तीव्र करण्यात आला. जिल्ह्यात 18,19,20 जुलै या तीन दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउन जिल्हा प्रशासनाने घोषित केले आहे.


केंद्र व राज्य सरकारने याआधी 24 मार्च पासून संपूर्ण lockdown घोषित केले होते. त्यानंतर अर्थचक्र पूर्वपदावर यावे यासाठी मिशन बिगीन अगेन सुरू करण्यात आले.मात्र, बहुतांशी नागरिकांनी,छोटे मोठे व्यापारी,विक्रेते यांनी  नियम धाब्यावर बसवून दैनंदिन व्यवहार सुरू केले. शासन-प्रशासनाचेही यावर काही नियंत्रण नव्हते. परिणामी कोरोनाने आपला विळखा अधिक मजबूत केला.

अकोला कोरोना हॉटस्पॉट असताना देखील अपवाद वगळता बहुतांशी अकोलेकरांनी नियमांचा फज्जा उडविला.याचा परिणाम समोर आला.कोरोनाग्रस्यांचा आकडा दोन हजार पार गेला. शहरी भागात पाहिले जास्त कोरोना रुग्ण होते.सध्या कमी झाले आहेत.मात्र,ग्रामीण भागात आता कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा हा प्रताप रोखण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निर्देशानूसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तीन दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउन घोषित केला.

हे सुद्धा वाचा:जिल्ह्यात 18,19,20 रोजी कडकडीत lockdown जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश


शनिवारी मात्र अकोलेकरांनी एकजुटीचे प्रदर्शन केले. दिवसभर शिस्त पाळली. रस्ते निर्मनुष्य होते. एरव्ही गजबजलेली रस्ते व चौक सामसूम होती.गांधी रोड,टिळक रोड, मोहहमद अली रोड, अकोला रेल्वे स्टेशन चौक, मदनलाल धिंग्रा चौक, जठारपेठ चौक,गौरक्षण रोड,सिंधी कॅम्प,डाबकी रोड,जयहिंद चौक,कौलखेड रोडवर शनिवारी शांतता होती. पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.


औषधी दुकाने आणि दवाखाने वगळता सर्वच व्यापारपेठ,गल्ली बोळातील दुकाने बंद होती. रविवार आणि सोमवारी lockdown सुरू राहील.यामधून वैद्यकीय सेवा,औषधी दुकाने यांना वगळण्यात आले आहे.दूध विक्री केंद्र केवळ सकाळी आणि संध्याकाळी काही अवधीसाठी सुरू राहतील.


इंडियन रेडक्रॉस सोसायटी दवाखान्यात मोफत उपचार  24 तास

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून कोरोना संकटकाळात जिल्हाधिकारी तथा संस्थेचे अध्यक्ष श्री जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन रेडक्रॉस सोसायटी ने आपल्या दवाखान्यात मोफत उपचार लॉकडॉउनच्या प्रारंभापासून सुरू ठेवले आहेत. त्याच प्रमाणे अकोला महानगरपालिकेतर्फे बैदपुरा बीट या नावाने सुभाष चौकातील रेड क्रॉस दवाखान्यात सुरू असलेल्या तपासणी व उपचार केंद्र तीन दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये २४ तास सुरू राहणार असून गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती मानद सचिव प्रभजीत सिंह बछेर यांनी केली आहे.

.........

टिप्पण्या