- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पुन्हा सावकार ग्रस्तांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडक
प्रभारी जिल्हा उपनिबंधक यांना घातला घेराव
भारतीय अलंकार
अकोला: गेल्या पंधरा दिवसा आधी सावकारग्रस्त असलेल्या नागरिकांनी प्रभारी जिल्हा उपनिबंधक यांना विविध मागण्यांचे निवेदन देत त्यावर लेखी उत्तर देण्याची मागणी केली होती. त्याकरिता पंधरा दिवसांचा कालावधी सुद्धा दिला होता , आज पंधरा दिवसांचा कालावधी आटोपला असून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तरांनी आपण समाधानी नसल्याचे सांगत सावकारग्रस्त यांनी पुन्हा जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडक दिली.
सविस्तर वृत्त असे की काही दिवसांआधी तत्कालीन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे व सहाय्यक आयुक्त (वस्तू व सेवा कर ) हे दोघेही दोन लाख रुपयांची लाच प्रकरणी पकडले गेले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सहकार विभागाच्या भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर लगेचच सावकार ग्रस्तानी प्रभारी जिल्हा उपनिबंधक यांना विविध मागण्यांचे निवेदन देत पंधरा दिवसाचा कालावधी दिला होता, सदर कालावधीत उत्तर न दिल्यास तसेच उडवाउडवीची उत्तरे दिल्यास कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा सुद्धा त्यावेळी सावकार ग्रस्तानी दिला होता. सदर निवेदन देऊन पंधरा दिवसाच्या नंतर सोमवारी पुन्हा सावकारग्रस्त यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडक दिली अन प्रभारी जिल्हा उपनिबंधक यांना घेराव घातला.
यावेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात चांगलीच तारांबळ उडाली होती. प्रभारी जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेली उत्तरे ही उडवा उडवीची असून समाधानकारक नाहीत तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय अवैध सावकारांचा बचाव करीत असल्याचा आरोप यावेळी सावकारग्रस्त यांच्यावतीने करण्यात आला. यापुढे जर अशीच उडवा उडवी ची उत्तरे दिल्यास सदर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा तसेच आत्मदहनाचा सुद्धा इशारा आंदोलनकर्त्यानी यावेळी दिला .
जिल्हाधिकऱ्यांच्या नावे खापर फोडण्याचा प्रयत्न !
संतोष राठी व राजेश राठी यांच्या घरी व प्रतिष्ठान वर छापेमारी प्रकरणात ४०० धनादेश व लाखोंची रक्कम मिळाल्यावर सुद्धा त्यांच्या विरुद्ध कारवाही का नाही केली असा जाब सावकार ग्रस्त आंदोलन कर्त्यानी विचारला असता सदर प्रकरणी चौकशी सुरू असून सद्या कुठलेही प्रकारची सुनावणी घेण्यात येऊ नये असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याची बतावणी करत प्रभारी उपनिबंधक यांनी त्यांच्या नावे खापर फोडण्याचा प्रयत्न केला.
तत्कालीन तालुका उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांना वाचविण्याचा खटाटोप
तत्कालीन तालुका उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांच्या बाबत प्रश्न विचारले असता त्या बाबतीत ही सर्व अहवाल प्राप्त असताना सुद्धा प्रभारी जिल्हा उपनिबंधक यांनी सपशेल खोटे व उडवा उडविची दिशाभूल करणारी अशी उत्तरे दिली , त्यामुळे एक प्रकारे सदर कार्यालय अवैध सावकारां प्रमाणे त्यांचा सुद्धा बचाव करीत असल्याचा आरोप तक्रार दार मनीष देशमुख यांनी केला.
.........
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा