HSC:राज्यात कोकण,विभागात बुलडाणा तर जिल्ह्यात पातुर अव्वल Konkan in the state, Buldana in the division and Patur in the district

राज्यात कोकण,विभागात बुलडाणा तर जिल्ह्यात पातुर अव्वल


अकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एमएसबीएसएचएसई) बारावीचा निकाल २०२० गुरुवारी जाहीर केला आहे.  महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन हे निकाल जाहीर करण्यात आले .मंडळाच्या मते, 90.66% विद्यार्थ्यांनी यावेळी बारावीची परीक्षा दिली आहे. मागील वेळेप्रमाणे या वेळेसही कोकण विभागाचा निकाल सर्वोत्कृष्ट ठरला तर औरंगाबाद मागे आहे.

मुलांच्या सोयीसाठी १२ वीचा निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in आणि mahresult.nic.in वर जाहीर करण्यात आला आहे.


मंडळाच्या समवेत महाराष्ट्र राज्य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल असे ट्विट करून माहिती दिली होती, पण मंडळाने हा निकाल सुमारे एक तासापूर्वीच जाहीर केला. मंडळा कडून मिळालेल्या माहितीनुसार 90.66 टक्के विद्यार्थी यावेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.  यामध्ये 93 .88% मुलींचा समावेश आहे, तर मुलांची उत्तीर्णता टक्केवारी  88.०4% आहे.  कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र मंडळाने यंदा गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे.



कोकण विभागाने 95.89% निकालासह संपूर्ण राज्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले.  पुणे विभाग. 92.50% निकालासह दुसर्‍या क्रमांकावर आहे.औरंगाबाद विभागाचा निकाल 88.18% लागला जो संपूर्ण राज्यात सर्वात कमी आहे.


गतवर्षीपेक्षा यंदाचा निकाल चांगला लागला असल्याचे मंडळाने म्हटले आहे.  मागील वर्षी महाराष्ट्र 12 वी चा निकाल 85.88% लागला होता. तर यावेळी निकाल 4.78% चांगला लागला.


अमरावती विभागाचा निकाल 92 .9 टक्के लागला. 

बुलडाणा जिल्ह्याने यंदा निकालात अव्वल स्थान पटकावले असून वाशीम दुस-या तर अमरावती जिल्हा शेवटच्या स्थानावर आहे.

अमरावती मंडळाचे सचिव अनिल पारधी यांनी निकाल जाहीर केला. राज्यात अमरावती विभाग चौथ्या क्रमांकावर असून गतवर्षी निकालाची टक्केवारी 87.5 टक्के होती. यंदा निकालाची टक्केवारी पाच टक्‍क्‍यांनी वाढली आहे. अमरावती विभागातील एकूण 1 लाख 43 हजार 323 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील 1 लाख 42 हजार 725 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. प्राविण्यासह प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 16 हजार 076 आहे. प्रथम श्रेणीत 59 हजार 052, द्वितीय 53 हजार 204 , तृतीय श्रेणीत 3 हजार 102 विद्यार्थी आहेत. एकूण 1 लाख 31 हजार 102 विद्यार्थी उत्तीर्ण झाले


विज्ञान शाखा प्रथम

अमरावती विभागातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सर्वाधिक 97.81 टक्के असून वाणिज्य शाखेचा निकाल 94 .04 टक्के, कला शाखा 87.35 तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 83.29 टक्के आहे.


64 विद्यार्थी दोषी

परीक्षेच्या काळात गैरमार्गाचा अवलंब करणा-या 73 विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. यातील 64 विद्यार्थी दोषी आढळून आले असून त्यांच्यावर मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे, तर 9 विद्यार्थी निर्दोष सिद्ध झाले.

नागपूर विभाग

राज्यात 21 फेब्रुवारी ते 20 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा पार पडली. नागपूर विभागातून 1 लाख 57 हजार 811 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील 1 लाख 56 हजार  877 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 1 लाख 43 हजार 772 विद्यार्थी उत्तीर्ण झाले


त्यात 72 हजार 376 मुली तर 71 हजार 349 मुले उत्तीर्ण झालीत. त्यांची टक्केवारी अनुक्रमे 94.13 आणि 89.26 इतकी आहे. विभागात गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही अव्वलस्थानी गोंदिया जिल्हा असून त्याची टक्केवारी 94.13 आहे. भंडारा जिल्हा 93.58% टक्‍केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे तर नागपूर 92.53 टक्‍क्‍यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. वर्धा जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी 87.40 टक्के लागला असून गडचिरोली जिल्ह्याचा निकाल 88.64 टक्के आहे. शाखानिहाय निकालाचा विचार केल्यास यंदाही विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 98.08 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल कला शाखेचा 84.61 टक्के लागला आहे. यंदाही परीक्षेत बारकोड पद्धतीचा वापर करण्यात आला होता.


नागपूर विभागाचा निकाल 91.65 टक्के लागला आहे. गेल्यावर्षी सर्वात शेवटी नवव्या स्थानावर असलेल्या नागपूर विभागाने यंदा मुंबई, लातूर, औरंगाबाद आणि नाशिक विभागाला धक्का देत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात 9.14 टक्‍क्‍याची वाढ झाली आहे.


फेरपरीक्षेतही वाढ

बारावीच्या परीक्षेत यंदा 10 हजार 767 पुर्नपरीक्षार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी 4 हजार 624 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी 42.95 टक्के आहे. गेल्यावर्षी 22.49 टक्के निकाल लागला होता. यावर्षी निकालात तब्बल वीस टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली.




सर्वाधिक – कोकण विभाग – 95.89 टक्के

सर्वात कमी – औरंगाबाद – 88.18 टक्के


कोकण – 95.89 टक्के

पुणे – 92.50 टक्के

कोल्हापूर – 92.42 टक्के

अमरावती – 92.09 टक्के

नागपूर – 91.65 टक्के

लातूर – 89.79 टक्के

मुंबई –89.35 टक्के

नाशिक – 88.87 टक्के

औरंगाबाद – 88.18 टक्के

अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 25 हजार 529 नियमित विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 25 हजार 468  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.


यापैकी 23 हजार 109  विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी 90.80 अशी आहे. उत्तीर्ण 23 हजार 109 विद्यार्थ्यांमध्य 11984 मुले व 11161 मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 87.88 टक्के, तर मुलींची टक्केवारी 94.15 टके अशी आहे.


अकोला जिल्ह्यात सर्वाधिक निकाल पातूर तालुक्याचा 93.08 टक्के लागला आहे. त्याखालोखाल अकोला तालुका 92.85 टक्के, बार्शीटाकळी तालुका 91.13 टक्के, मुर्तीजापूर तालुका 90.38 टक्के, अकोट तालुका 88 .91 टक्के, बाळापूर तालुका 86.98 टक्के व तेल्हारा तालुका 84.91 टक्के असा क्रम आहे.

राज्याची स्थिती

राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के लागला आहे.

यंदा निकाल 4.78 टक्क्यांनी वाढला

यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे.

उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 93.88 टक्के

उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 88.04टक्के

कला शाखा : 82.63 टक्के

वाणिज्य शाखा : 91.27 टक्के

विज्ञान शाखा: 96.93 टक्के

एमसीव्हीसी : 95.07 टक्के

परीक्षेसाठी एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी 15 लाख 5 हजार 27 

यामध्ये विद्यार्थी 8 लाख 43 हजार 552

विद्यार्थिनी 6 लाख 61 हजार 325

एकूण 3 हजार 36 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.

.........

टिप्पण्या