Gurupornima: शिक्षण मंचतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव

शिक्षण मंचतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव 

अकोला : अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्नित शिक्षण मंच अकोला जिल्हा शाखेच्या वतीने गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन उत्साहात झाले. 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सीताबाई कला महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.दिनकर उंबरकर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांचा परिचय जिल्हा महामंत्री डॉ. श्रीकृष्ण काकडे यांनी करून दिला. त्यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ.अनुप शर्मा यांनी सत्कारमूर्ती प्रा.डॉ. दिनकर उंबरकर यांचा सत्कार केला. 

मार्गदर्शन करताना डॉ.दिनकर उंबरकर यांनी, भारतातील गुरु-शिष्य परंपरेचे विवेचन केले. गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची विशेष ओळख आहे. भारतात प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरेने संस्कृती घडविण्याचे कार्य केलेले आहे. निकोप समाज निर्मितीसाठी ही गोष्ट अत्यंत मोलाची ठरलेली आहे.गुरूंनी या समाजाला भरपूर दिलेले आहे. आजच्या काळात सुद्धा गुरूंनी कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता आपल्या शिष्यांना भरभरून दिले पाहिजे. जे काही ज्ञान आपल्याजवळ आहे,ते पूर्ण शिष्यांना दिले पाहिजे, शिष्यांनीही ते नम्रपणे स्वीकारले पाहिजे. तरच आपल्या देशाची व समाजाची प्रगती होईल, गुरू-शिष्याचे नाते ही टिकून राहिल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाला प्राचार्य विनायक जायले, प्रा.डॉ. धनश्री पांडे, डॉ. ममता इंगोले, डॉ.प्रशांत पिसोळकर, डॉ.ज्ञानसागर भोकरे, प्रा. रामरतन येऊल, प्रा. नितीन चौधरी , प्रा.डॉ. शिवाजी नागरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
........

टिप्पण्या