हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सारथी... Govt provides Rs 4 lakh to Wadokar family through MLA Amol Mitkari's initiative

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सारथी...

आमदार अमोल मिटकरींच्या पुढाकाराने  वाडोकार परिवाराला शासनाकडून ४ लाखांची मदत
 

अकोला:वडाळी देशमुख येथील शेतमजूर महिला संगीता सुधाकर वाडोकार शेतातुन घरी परत येतेवेळी गावा जवळील नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने २९ जून रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात त्यांन दोन मुले व पती असून, मृतक महिला अत्यंत गरीब कुटुंबातील होती. ही घटना विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांना कळताच, त्यांनी तात्काळ अकोट तहसीलदार याच्याशी संपर्क करीत वाडोकार कुटूंबाला शासन निर्णयानुसार त्वरित मदतनिधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली असता, शासन व प्रशासनाच्या सहकार्याने केवळ ६ दिवसांमध्ये वाडोकर परिवाराला प्रशासनाच्या वतीने चार लाख रुपयांच्या मदतनिधीचा धनादेश विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी,अकोट तहसीलदार अशोक गीते,नायब तहसीलदार राजेश गुरव अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या हस्ते  सोमवारी सुपूर्द करण्यात आला.


शासन प्रशासनाच्या समन्वयाने त्वरित मिळालेला हा मदतनिधी धनादेश मृतक महिलेच्या दोन्ही मुलांच्या नावाने करून पुढील शिक्षणासाठी या निधीचा विनियोग व मुलांना चांगले जीवन मिळावे, या उद्देशाने मुलांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येणार असून आलेले दुःख खूप मोठे आहे. मात्र, एवढ्या मोठ्या दुःखावर शासनाकडून प्रेमाची ही छोटीशी फुंकर कायम सोबत राहणारी असावी, असे प्रतिपादन यावेळी कुटुंबाचे सांत्वन करताना आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शंकरराव चौधरी,डॉ निलेश वानखडे, विशाल बोरे,श्याम राऊत,सोपान कुटाळे,अमोल काळणे,निनाद मानकर, श्रीयश चौधरी यांच्यासह वडाळी देशमुख येथील लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
.........

टिप्पण्या