Education: कौशल्यप्रधान व बदलत्या काळानुसार गुणात्मक शिक्षण दयावे- डाॅ.विजय जोशी

कौशल्यप्रधान व बदलत्या काळानुसार गुणात्मक शिक्षण दयावे- डाॅ.विजय जोशी

श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये नॅक जनजागृती या विषयावर वेबिनार 

अकोला: श्री शिवाजी महाविद्यालयातील आय.क्यु.ए.सी. विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान (रुसा) महाराष्ट्र राज्य आणि सहसंचालक उच्च शिक्षण विभाग अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नॅक जनजागृती या विषयावर एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा २३ जून रोजी पार पडली. 

कार्यशाळेमध्ये जिल्हयातील वरिष्ट महाविद्यालयातील सर्व प्राचार्यांचा सहभाग होता. कार्यशाळेला  विविध महाविद्यालयातून एकूण २९६ प्राध्यापकांचा सहभाग होता. अमरावती विभाग उच्च शिक्षण सहसंचालक डाॅ.केशव तुपे यांनी कार्यशाळेबाबत संकल्पनात्मक मत मांडले तर  तर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ.मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते ऑनलाईन कार्यशाळेचे उदघाटन पार पडले.

याप्रसंगी प्रथम सत्रामध्ये नांदेड विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील डाॅ.वाणी लातुरकर यांनी नॅकची संपूर्ण प्रक्रीया महाविद्यालयाने कशी राबवावी एस.एस.आर. कसा सब्मीट करावा नॅकच्या प्रत्येक सायकलला कसे सामोरे जावे नॅक करतांना कोणती आव्हाने व प्रश्न महाविद्यालयांना पडतात याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दुस-या सत्रात डाॅ.दीपक नानावरे यांनी महाविद्यालयांना नॅकला सामोरे जातांना कोणती कागदपत्रे कशी सादर करावे कोणत्या समस्या येतात त्या दूर कशा कराव्या हयाविषयी मार्गदर्शन केले. तिस-या सत्रात डाॅ.विजय दोषी यांनी उच्च शिक्षणातील गुणात्मक विकासावर विशेष भाष्य आपल्या वक्तव्यातून केले. गुणात्मक विकासाशिवाय वरिष्ठ महाविद्यालय उच्च शिक्षणामध्ये टीकू शकणार नाहीत त्यामुळे विद्यार्थी केंद्र मानून विद्याथ्र्यांना त्यांच्यातील कौशल्यप्रधान व बदलत्या काळानुसार गुणात्मक शिक्षण दिले जावे असे मत त्यांनी व्यक्त केले.  डाॅ. भोले आणि डाॅ.दीपक नन्नावरे यांनी नॅक संदर्भात नवी आव्हाने कोणती आहेत यावर आपआपली मते व्यक्त केली. राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान (रुसा) महाराष्ट्र राज्याचे अधिकारी डाॅ.पी.एन. पारबेकर यांनी नॅक संदर्भातील संकल्पनात्मक माहिती व नॅक संदर्भातील नवी आव्हाने यावर मार्गदर्शन केले. 

कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री शिवाजी महाविद्यालयातील आय.क्यु.ए.सी.समन्वयक डाॅ.आशिष राउत यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.रामेश्वर भिसे यांनी समरोपीय सत्राला नॅक संदर्भात महाविद्यालयातील पार पडलेल्या हया कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त केले व नॅकबाबत महाविद्यालयातील कार्यपध्दतीविषयी माहिती दिली. 

पाहुण्यांचा परिचय डाॅ.पी.एस.कोकाटे, डाॅ.जी.व्ही.कोरपे व डाॅ.दिपक कोचे हयांनी सहभागीं लोकांच्या प्रश्नोत्तरे दिली. डाॅ.अंजली कावरे आणि डाॅ.श्रध्दा थोरात, डाॅ.संजय शेंडे, डाॅ.संलय पल्हाडे, श्री.राजेश गिते यांचा आयोजन समितीमध्ये सहभाग होता. डाॅ.अनिल राउत यांनी कार्यशाळेचे आभारप्रदर्शन केले. प्रा.शुभम राठोड, अनिल भिलकर, प्रा.निखिल चौखंडे यांनी तांत्रिक सहकार्य केले.
.........

टिप्पण्या