Corona virus news:अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या २०२६

अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या २०२६ 

४२३ अहवाल प्राप्त; २१ पॉझिटीव्ह, २७ डिस्चार्ज

अकोला,दि.१७:आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  ४२३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४०२ अहवाल निगेटीव्ह तर २१ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या २०२६ (१९५९+६७) झाली आहे. आज दिवसभरात २७ रुग्ण बरे झाले,असून आता २६० जणांवर उपचार सुरु आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १६१४८   जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १५६७१फेरतपासणीचे  १६० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१७  नमुने होते. आजपर्यंत एकूण १६०५३  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १४०९४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १९५९आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आज २१ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात २१ जणांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त अहवालात १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहेत.  त्यात अकोट, मुर्तिजापूर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, तर बोरगाव मंजू, लोकमान्य नगर, सिद्धी विनायक हॉस्पिटल, शंकरनगर, रामगर, जीएमसी होस्टेल, तेल्हारा, बादखेड ता. तेल्हारा, पातूर, येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.  तर सायंकाळी सहा जणांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन महिला व चार पुरुष आहेत. ते  मोठी उमरी, सातव चौक, सिंधी कॅम्प, लोहारा ता. बाळापूर,  मुर्तिजापूर, हिवरखेड ता. तेल्हारा येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
काल (दि.१६) रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्ट मधील ४६ जणांचे पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचा समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह संख्येत केला आहे.

२७ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, कोविड केअर सेंटर मधून २२ तर हॉटेल रिजेन्सी मधून दोन  अशा एकूण २७ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले तेल्हारा, मुर्तिजापूर आणि मलकापूर-अकोला येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज दिलेल्या २२ जणांपैकी आठ जण बाळापूर येथील, पाच जण अकोट येथील,  चार जण महान येथील, दोन जण चांदूर येथील तर बार्शी टाकळी, खडकी व शिवनी येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.

२६० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या २०२६(१९५९+६७) आहे. त्यातील ९९ जण (एक आत्महत्या व ९८ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची १६६७ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत २६० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

*रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात ३२३ चाचण्या, नऊ पॉझिटिव्ह*
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ३२३ चाचण्यामध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न  झाले अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे अकोला मनपा हद्दीत २४ चाचण्या झाल्या त्यात एकही पॉझिटिव्ह नाही. (आजपर्यंत अकोला मनपा हद्दीत २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.) अकोला ग्रामीण मध्ये ७२ चाचण्या होऊन दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तेल्हारा येथे ६५ जणांच्या होवून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाळापूर येथे ४३ चाचण्या झाल्या तेथेही एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. पातूर येथे ५८ चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाशिटाकळी येथे ६१चाचण्या झाल्या त्यात आज एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे दिवसभरात ३२३ चाचण्यांमध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आजअखेर जिल्ह्यात १४३२ रॅपिड ॲन्टीजन टेस्टव्दारे ९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे,असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
.........
राज्याची स्थिती 

राज्यात आज २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ८४ हजार ६३० नमुन्यांपैकी २ लाख ९२ हजार ५८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.७ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख २४ हजार ६०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९१ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २५८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-१२, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-१४, कल्याण-डोंबिवली मनपा-१४,भिवंडी-निजामपूर मनपा-१२, मीरा-भाईंदर मनपा- ५, पालघर-१, वसई-विरार मनपा-११, रायगड-७, पनवेल मनपा-१, नाशिक-७, नाशिक मनपा-१८, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, जळगाव-३, जळगाव मनपा-१, पुणे-७, पुणे मनपा-२१, पिंपरी-चिंचवड मनपा-१७,सोलापूर मनपा-३, सोलापूर मनपा-६, सातारा-५, कोल्हापूर-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-३, जालना-४,हिंगोली-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-२, बीड-१, नांदेड-३, नांदेड मनपा-३,अमरावती मनपा-२, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.



देशातील कोरोना परिस्थिती

देशातली कोरोनाबाधितांची संख्या तीन दिवसांतच नऊ लाखावरून दहा लाखावर गेली आहे. देशभरात काल ३४ हजार ९५६ रुग्ण वाढले. आतापर्यंतची एका दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहेत. आतापर्यंत बाधित झालेल्यांची एकूण संख्या १० लाख तीन हजार ८३२ झाली आहे.


  यापैकी ६ लाख ३५ हजार ७५६ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ६३ पूर्णांक ३३ शतांश टक्के आहे.  


  देशात सध्या ३ लाख ४२ हजार ४७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोना विषाणुमुळे काल ६८७ रुग्णांचा मृत्यू झाला. तयामुळे कोरोनाबळींची संख्या आता २५ हजार ६०२ झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.


टिप्पण्या