Chocklet Sarkar:आम आदमी पक्षाने केला 'चॉकलेट सरकार' चा निषेध!

आम आदमी पक्षाने केला 'चॉकलेट सरकार' चा निषेध!


अकोला: मनपा चौकातील पेट्रोल पंप समोर  वाहन धारकांना चॉकलेट वाटप करून 'चॉकलेट सरकार' म्हणून मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला.
भाजपचे  सरकार हे केंद्रात  सरकार  आहे हे सरकार स्थापन होण्यापूर्वी  नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेला मोठी आश्वासन दिले होते . मात्र ,लोकांना दिलेली  आश्वासने अजूनही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न मोदी सरकार कडून केले गेले नाहीत .

देशातील जनतेसाठी ६० लाख हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले . मात्र ,देशातील जनतेला त्याचा फायदा अद्यापही झाला नाही. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर  कच्या  तेलाचे भाव एकदम कमी असतांनाही देशात पेट्रोल,डिझेलचे भाव  दररोज मोठया वेगाने  वाढत आहेत.  त्यामुळे आपोआप देशातील बाजारात महागाई वाढली आहे. पहिल्यांदाच जगात कोरोनामुळे आर्थिक स्थिती  कमजोर झाली असून, मजुरांच्या हाताला काम नाही . व्यापाऱ्यांच्या मालाला लॉकडाऊनचा फटका बसला आहे  अश्याप्रकारे  देशातील  सर्वसामान्य जनता  भरडली जात आहे  त्यात पेट्रोल,डिझेल भाव  दररोज वाढतच आहेत या पेट्रोल,डिझेल  भाव वाढीचा अकोल्यात आम आदमी पक्षाचे शहर शाखेच्या  वतीने मनपाच्या बाजूच्या पेट्रोलपंप जवळ चॉकलेट वाटप  करून केंद्र सरकारचा  निषेध  व्यक्त करण्यात आला  आहे .

पेट्रोल दर वाढीचा  निषेध म्हणून आम आदमी पक्षाचे वतीने  चॉकलेट वाटप आंदोलन  केले.  यावेळी  शेख अन्सार ,संदीप जोशी, गजानन गणवीर ,अलीम मिर्झा,  मुजीबुर रहेहमान, रविन्द्र सावाळेकर , अरविन्द कांबळे,अब्दुल रफीक  ,काजी लायक अली ,ठाकुरदास चौधरी ,दिलीप पाटिल, प्रवीण कावरे आशुतोष शेंगोकार,दिनेश शिरसाट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
.........

टिप्पण्या