- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ऐश्वर्या-आराध्या बच्चन देखील पॉझिटिव्ह
* अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत सुधारणा
* चाहते आणि डॉक्टरांचे मानले आभार
*जया बच्चन निगेटिव्ह
मुंबई:शनिवारी, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट सकारात्मक (पॉझिटिव्ह) आल्या नंतर संपूर्ण बच्चन कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली. ऐश्वर्या, आराध्या आणि जया बच्चन यांची कोरोना टेस्ट झाली. मात्र,यात त्या निगेटिव्ह आढळल्या. रविवारी पुन्हा चाचणी झाल्यानंतर ऐश्वर्या आणि आराध्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले.
कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टनंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांना घरी अलिप्त राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अहवालानुसार , त्यांच्यात कोरोनाची तीव्र लक्षणे नसल्याने त्यांना घरीच राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यावेळी त्यांनी जया बच्चनपासून अंतर ठेवण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. कारण जया बच्चन यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जेणेकरून हे संक्रमण त्यांच्यात पसरू नये.
घर कामगार व कर्मचाऱ्यांचे घेतले नमुने
ऐश्वर्या, आराध्या आणि जया बच्चन यांच्या कोरोना टेस्टनंतर बच्चन कुटुंबातील घर कामगार आणि कर्मचाऱ्यांचे स्वाब नमुने घेण्यात आले आहे. अद्याप अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५४ कर्मचारी कुटुंबाच्या संपर्कात आले होते. यापैकी २८ लोकांची बीएमसीने स्वाब कोरोना टेस्ट केली आहे.
चाहत्यांनी प्रार्थना केली
शनिवारी अमिताभ बच्चन यांनी, स्वतः आपल्या कोविड -१९ positive असल्या बद्दल समाज माध्यमातून सांगितले होते. त्यानंतर लवकरच अभिषेकनेही स्वतःला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली. दोघेही नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांची तब्येत पहिल्यापेक्षा चांगली आहे.अमिताभ बच्चन यांनी रविवारी व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वस्थ असून, चाहत्यांच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे हे घडले, असे सांगून देवरूपी डॉक्टर आणि नर्स यांचे हार्दिक आभार मानले.
.........
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा