Akola MNC:अकोला महापालिका महासभेत 'गोंधळात गोंधळ'!

अकोला महापालिका महासभेत 'गोंधळात गोंधळ'!


 ठळक मुद्दे

*५५७.३७ कोटींचा बजेट मंजूर

 *१४ व्या वित्त आयोगावरुन गोंधळ 

 *फिजिकल डिस्टनसिंग नियमाचा फज्जा


अकोला: महापालिकेच्या गुरुवारी दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेचे दुसरे सत्र १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरुन गाजले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या विषयावरुन सभेत गोंधळ घातला. 

नगरसेवक रहीम पेंटर यांनी सभागृहात ठिय्या दिला. बराच वेळ हा प्रकार सुरू होता. विरोधी पक्षनेते साजीदखान पठाण व सदस्यांनी त्यांचे समर्थन केले. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बिले काढण्यात आले होते,असा आरोप विरोधकांनी केला. प्रत्यक्षात या संदर्भात राज्य शासनाकडून ८० टक्के निधी यायचा आहे. परंतू, सत्तापक्षाने २० टक्के निधी बिले मंजूर करण्यासाठी टाकल्याचा सदस्यांचा आरोप होता. या मुद्यावरुन सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. गोंधळातच काही विषय मंजूर करण्यात आले. यामध्ये काँग्रेसचे डॉ. झिशान हुसेन यांनीही झालेला प्रकार गैर असल्याचा मुद्दा सभेत मांडला.

करवसुली विभाग

अकोला महानगरपालिका क्षेत्रातील संपूर्ण मालमत्ता थकीत कर वसुलीस चालना देण्याकरीता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कराधान अधिनियम ८ कलम ५१ अन्वये व्याज माफी करीता अभय योजना ३१ जुलै पर्यंत सुरु करावी,या विषयावर अकोला महानगर पालिकेच्या गुरुवारी बोलवण्यात आलेल्या महासभेत चर्चा झाली.

सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे माहे मार्च २१ तारखे पासुन कोविड-१९ विषाणूचा प्रार्दुभाव वाढल्यामुळे संपूर्ण अकोला शहरामध्ये संपुर्ण लाकडाऊन करण्यात आले आहे.त्यामुळे मालमत्ता धारकांना थकीत व चालु मालमत्ता कराचा भरणा केला नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण ८ कराधान नियम मधिल कलम ४१ अन्वये थकीत मालमत्ता कराच्या रकमेवर शास्ती (व्याज) आकारण्याची तरतुद आहे. त्याअनुषंगाने

थकीत कराच्या रकमेवर शास्ती (व्याज) आकारण्यात आले आहे,असे करविभाग कडून स्पष्ट करण्यात आले.थकीत कर वसुलीस चालना देण्याकरीता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कराधन नियम ८ कलम ५१ अन्वये शास्ती माफी करिता ३१जुलै अभय योजना सुरु करण्यात आली आहे.तसेच महापौर (मनपा) यांनी ११ जून रोजी, ३१ जुलै पर्यंत शास्ती अभय योजना सुरु करणेबाबत  येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये कार्योत्तर मंजुरी प्रदान करणे बाबत पत्र दिले आहे.त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण ८ कराधान नियम मनपा आयुक्त यांनी दिलेल्या मान्यतेनुसार ३१जुलै पर्यंत शास्ती अभय योजना सुरु करण्यात आली आहे. ५१ अन्वये मनपा प्रशासन उपायुक्त यांनी महासभेच्या अवलोकनार्थ व कार्योत्तर मंजुरीस्तव प्रस्ताव सादर केला.

मात्र, भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी ही मुद्दत वाढवण्याची मागणी केली. तर विरोधकांनी ही तारीख वाढवून ३१ डिसेंबर करावी, अशी सूचना केली आहे. यानंतर सभेत गोंधळ उडाला. या गोंधळातच ५५७.३७ कोटींचा बजेट मंजूर करण्यात आला.यासर्व गोंधळात सामान्य नागरिकांना covid19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सचा नियम पाळा, असे सांगणारेच या नियमांचे उल्लंघन करताना दिसले. लोकप्रतिनिधी यांच्यासह मनपा प्रशासन अधिकारी कर्मचारी यांनी देखील नियमाचा फज्जा उडविला.

……...



टिप्पण्या