World carrom:कॅरमची जागतिक ऑनलाइन स्पर्धा २५ जून पासून

कॅरमची जागतिक ऑनलाइन स्पर्धा २५ जून पासून

 ऑनलाईन कॅरम चॅलेंज इंडिया २०२०


अकोला: कॅरम जगातील प्रतिष्ठेची वर्ल्ड ऑनलाइन कॅरम चॅलेंज स्पर्धा २५ ते ३० जून पर्यंत होणार आहे. विश्वविजेता  एस. अपूर्वा, योगेश परदेशी, प्रशांत मोरे ,रश्मी कुमारी ,निशांत फर्नांडो तसेच के श्रीनिवास आणि इंटरनॅशनल फेडरेशन चषक विजेता रियाज अकबर अली सह  भारत, अमेरिका, कॅनडा, श्रीलंका, स्विजरलैंड पोलैंड, जर्मनी, फ्रांस ब्रिटेन, यूएई, सिंगापुर, मलेशिया, मालदीव, नीदरलैंड, आणि स्वीडन या पंधरा देशातील नामांकित ६३ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
पुरुष व महिला गटात प्रथम तीन स्थानावर येणाऱ्या खेळाडूंना इंटरनॅशनल कॅरम फेडरेशनचे अध्यक्ष जोसेफ मेयर एकूण १ लक्ष ४० हजार रुपयाचे बक्षीस देणार आहेत.पुरुष गट ₹३००००/₹२००००/₹१५०००/ महिला गट ₹२००००/₹१५०००/₹१००००/ प्रमाणे याशिवाय प्रत्येक वाईट स्लॅम ₹. ₹१०००/ व दुहेरी वाईट आणि ब्लॅक स्लॅम करिता ₹२०००/ रुपये व अल्टिमेट स्लॅम करिता  ₹३००० /  बक्षीस सिन्को इंडस्ट्रीज तर्फे देण्यात येणार आहे.

कॅरम‌च्या प्रचलित नियमानुसार ही स्पर्धा होणार आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू नसल्यामुळे खेळाडूला प्रतिस्पर्धाची  भूमिका करावी लागणार असून जागा न बदलता त्याला स्पर्धक व प्रतीस्पर्धक म्हणून खेळावे लागणार आहे. प्रत्येक खेळाडूला ८ बोर्ड खेळायचे असून पांढरी सोंगटी असणाऱ्या खेळाडूला नंतर त्याच ठिकाणाहून काळी सोंगटी घेऊन खेळावे लागणार आहे.
वर्ल्ड ऑनलाइन कॅरम चॅलेंज इंडिया २०२० (World Online Carrom challenge India- 2020)
या फेसबुक ग्रुप वर २५ ते २८ जून पर्यंत सर्व खेळाडू प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी होतील. प्रत्येक देशासाठी वेळ स्थानिक सायंकाळी ६ ते रात्री ११.३०  पर्यंत राहील. २९ जून रोजी उप्यान्त सामने होतील ३० जून ला अंतिम सामना होईल.


सर्वोत्तम वाईट स्लॅम, ब्लॅक स्लॅम, आणि अल्टिमेट स्लॅम ठरविण्यासाठी अर्जुन पुरस्कार प्राप्त ,भूतपूर्व विश्वविजेता ऐ मारिया इरूदयाम, भूतपूर्व राष्ट्रीय विजेता सुहास कांबळी, भारतीय कॅरम महासंघाचे कोषाध्यक्ष भारतीय कॅरम संघाचे प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय विजेते अरुण केदार हे पंच म्हणून भूमिका राबविणार आहे. याशिवाय महेश सेखरी, (चंदिगड) काशिराम, (मध्य प्रदेश) केतन चिखले (महाराष्ट्र) आणी कुमार अजय ((दिल्ली) ही चमू तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहतील.

२० जून रोजी फेसबुकवर जोसेफ मेयर यांनी स्पर्धेची पूर्वतयारी बद्दल समाधान व्यक्त केले आहे. ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे अध्यक्ष तथा आसामचे विरोधीपक्षनेते रकीबूल हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून २५ जूनला ते व इतर सदस्य स्पर्धकांना शुभेच्छा देणार आहे. उदघाटनच्या दिवशी फेडरेशनचे पेट्रोन आमदार गिरीश व्यास देखील स्पर्धकांना शुभेच्छा देणार आहे,अशी माहिती ऑल इंडिया कॅरम फेदरेशनचे उपाध्यक्ष तथा विदर्भ कॅरम असोसिएशनचे सचिव यांनी प्रभजीत सिंह बछेर यांनी दिली.
.........

टिप्पण्या