Womens doctor:'आयएमए'च्या 'वुमन्स डॉक्टर विंग'ने लॉकडाउन काळात राबविले विविध उपक्रम!

'आयएमए'च्या 'वुमन्स डॉक्टर विंग'ने
लॉकडाऊनच्या काळात राबविले विविध उपक्रम!

अकोला: 'आयएमए'च्या 'वुमन्स डॉक्टर विंग' संघटनेने लॉकडाऊनच्या काळात विविध उपक्रम राबविले. त्यामध्ये डॉक्टर भगिनींसाठी योगा आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती संघटनेच्या सचिव डॉ. निर्मला रांदड यांनी दिली.

मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी पॉझिटिव्ह थिंकींगची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत डॉ. शीतल मुरारका, डॉ. निर्मला रांदड आणि डॉ. दिया बिरवाणी यांनी पारितोषिके मिळविली. जागतिक पर्यावरण दिनी स्लोगन स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये डॉ. नयना तेलकर, डॉ. साधना लोटे, डॉ. लीना आगाशे, डॉ. शीतल मुरारका यांनी पारितोषिके मिळविली. 

जागतिक योग दिनानिमित्त योगासनाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. वंदना बागडी आणि विनीता जैवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये ३५ डॉक्टर भगिनींनी सहभाग नोंदविला. याव्यतिरिक्त कुकींग अर्थात स्वयंपाकाची स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेतही डॉक्टर भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये डॉ. क्षितीजा मराठे, डॉ. अर्चना अनासाने, डॉ. वर्षा घाटे, डॉ. सुवर्णा भोपाळे, डॉ. झेलम देशमुख यांना पारितोषिके मिळाली. 

या सर्व उपक्रमांचे आयोजन वुमन्स डॉक्टर विंगच्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी मोरे आणि सचिव डॉ. निर्मला रांदड यांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करीत ऑनलाईन केले. त्यांच्या या उपक्रमाचे वैद्यकीय क्षेत्रात कौतुक होत आहे.
.........

टिप्पण्या