Sushant SinghRajput:सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बॉलीवूड मधील बड्या हस्तीवर बिहार मधील न्यायालयात तक्रार दाखल A case has been filed against Bollywood biggies in connection with Sushant Singh Rajput's suicide case.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बॉलीवूड मधील बड्या हस्तीवर बिहार मधील न्यायालयात तक्रार दाखल
करण जोहर, सलमान खान, संजय लीला भन्साळी, एकता कपूर यांच्यासह ८ जणांविरुद्ध तक्रार 
भारतीय अलंकार
अकोला: चित्रपट अभिनेता सलमान खान, करण जोहर, संजय लीला भन्साळी, आणि एकता कपूर यांच्यासह बॉलिवूडमधील ८ दिग्गजांवर  आरोप करून, बिहार मधील मुजफ्फरपूरच्या न्यायालयात अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अ‍ॅडव्होकेट सुधीर कुमार ओझा यांनी भा.दं.वि. कलम ३०६, १०९, ५०४ आणि ५०६ नुसार तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी ३ जुलै रोजी सिजेएम कोर्टात सुनावणी होणार आहे.

१४ जूनला  मुंबईतील वांद्रे मधील  अपार्टमेंट मध्ये  ३४ वर्षीय अभिनेता सुशांत सिंह राजपुतने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्याच्या खोलीत मृत अवस्थेत आढळला होता. सुशांत हा पाटणा, बिहार येथील रहिवासी होता. अल्पावधीतच त्याने बॉलीवूड मध्ये स्वबळावर यश मिळविले होते.



बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूने बॉलिवूडमधील अनेक दडलेली रहस्ये समोर येण्यास सुरुवात झाली आहे. सुशांतच्या धक्कादायक निधनानंतर कंगना रनौत, अभिनव कश्यप, प्रकाश राज, रविना टंडन,शेखर कपूर आदींनी काही प्रस्थापित छोट्या शहरातून येणाऱ्या प्रतिभावंत कलाकारांचे मानसिक खच्चीकरण करत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे आता सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी करण जोहर, संजय लीला भन्साळी आणि एकता कपूर कायदेशीर अडचणीत सापडले आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेशी सवांद साधताना वकील ओझा यांनी सांगितले की, “तक्रारीत मी आरोप केला आहे की सुशांतसिंग राजपूतला सुमारे सात चित्रपटातुन काढून टाकले होते, आणि त्याचे काही चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने त्याला टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पडले गेले. ”

विशेष म्हणजे कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी, यापूर्वीच दावा केला होता की, सुशांतने सात सिनेमे गमावले आहेत.  निरुपम यांनी ट्विट केले की, "त्याने फक्त सहा महिन्यांतच चित्रपट गमावले. का? चित्रपट उद्योगातील निर्दयीपणा एका वेगळ्या पातळीवर काम करतो. आणि त्या निर्दयतेने एका प्रतिभावान व्यक्तीचा जीव घेतला," असे निरुपम यांनी ट्विट केले.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिस चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक स्पर्धेची सखोल चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले.


सुशांतच्या आत्महत्या प्रकरणानंतर चंदेरी दुनियेतील झगमगाटाला एक काळी किनारही लागलेली आहे,हे सामान्य नागरिकांना कळले आहे. याचा उद्रेक बिहारमध्ये पाहायला मिळत आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सामील असणाऱ्यांना पुढे शिक्षाही होईल,किंवा पुरावा अभावी आरोप तथ्यहीन असल्याचेही कदाचित सिद्ध होईल. परंतु एक प्रतिभा संपन्न अभिनेता हिंदी चित्रपट सृष्टीने गमावला आहे,एव्हढे निश्चित.
..................






टिप्पण्या