Flood:पुरात वाहुन गेलेल्या इसमाचा मृतदेह अखेर सापडला! The body of Person, who was swept away in the flood, was finally found!

पुरात वाहुन गेलेल्या इसमाचा मृतदेह अखेर सापडला!


संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाला आले यश


घटनास्थळ 
जांभुळ ढाबा ता.मलकापुर जि.बुलढाणा या गावानजिक असलेला शेत नाला. 
वाहुन गेलेल्या व्यक्तीचे नाव : अनंत विरसेन वाने (पाटील) वय अंदाजे(४६) रा.जांभुळ ढाबा ता.मलकापुर जि. बुलढाणा


नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: बुलडाणा जिल्ह्यातील जांभुळा येथील रहिवासी अनंत पाटील ११ जून पासून बेपत्ता होते.नातेवाईकांनी शोध घेतला असता आढळून आले नव्हते.पुरात वाहून गेल्याची श्यक्यता नातेवाईकांनी व्यक्त होती.अखेर प्रशासनाने अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्तकालीन पथकाला पाचारण केले. दोन दिवस शोधकार्य पथकाने केले.अखेर रविवार १४ जून रोजी अथक प्रयत्नांना यश मिळाले. अनंत पाटील यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.

घटनाक्रम : ११ जुन रोजी रात्री १० च्या  वाजताच्या दरम्यान अनंत पाटील हे आपल्या शेतातुन मोटारसायकलने घरी परतताना शेत नाल्याला आलेल्या पुरात मोटारसायकल सह वाहून गेले होते. मात्र, गावाजवळ मोटारसायकल अडकली. यावेळी स्थानिक नागरिकांनी शोध घेतला.  दुस-या दिवशीही शोध घेतला असता ते आढळले नाही. नाल्याचे मोठया प्रमाणात खोलीकरण झाले असल्याने, अनंत पाटील हे पुढे वाहुन गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली .

नातेवाइकांच्या सांगण्यावरून शेवटी मलकापुरचे तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी १२ जुनला रात्री पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देवून, लगेच सर्च ऑपरेशनसाठी येण्याचे सांगितले. १३ जुन रोजी दुपारी पथकाची रेस्क्यु टीम आणि आपात्कालीन वाहन व सर्च ऑपरेशन साहीत्यासह पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात पथकाचे जवान सागर आटेकर, अंकुश सदाफळे,सुरज ठाकुर,अजय जाधव, ऋषीकेश तायडे,मयुर कळसकार,मयुर सळेदार, गोविंदा ढोके,गोकुळ तायडे, हे घटनास्थळी पोहचले. रात्री उशिरा पर्यंत ५ की.मी.पर्यंत सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. परंतू, अनंत पाटील हे आढळून आले नाही. रात्री अंधार  पडल्यामुळे सर्च ऑपरेशन थांबविण्यात आले होते. 

तहसीलदार डोईफोडे यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी फोनवरून विनंती केली की, रेस्क्यु टीमला मलकापुरलाच मुक्कामी थांबुन ठेवा. या विनंती वरुन दीपक सदाफळे यांनी आपली रेस्क्यु टीम ही मलकापुरलाच मुक्कामी थांबवली. १४ जुन रोजी सकाळी ८ वाजता पुन्हा (डीप सर्च ऑपरेशन, आणि टीम स्पेस ऑपरेशन) हे तीव्र केले. पुढे सर्च ऑपरेशन चालु ठेवले.
शेवटी  घटनास्थळा पासुन अंदाजे १२-१३ की.मी.अंतरावर राणगाव नजिक असलेल्या व्याग्रानदी पात्रात रेस्क्यु टीमने रविवारी  दुपारी ४ वाजता अनंत पाटील यांचा मृतदेह शोधुन बाहेर काढला.



या घटनेनंतर दोन वेळा पुर आल्यामुळे अनंत पाटील यांचा मृतदेह व्याग्रानदी पात्रात वाहुन आल्याची माहिती रेस्क्यु टीम ने दिली. यामुळे जांभुळ ढाब्यासह मलकापुर तालुक्यात या रेस्क्यु टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

यावेळी सर्च ऑपरेशनसाठी मलकापुर तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे ,नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांचे मोलाचे सहकार्य  लाभले. सोबत मलकापुर चे नि.वा.नायब तहसीलदार गजानन राजगडे ,जांभुळ ढाबा चे मं.अ.एच.डी. पवार, तलाठी एस.ओ. काळे आणि नातेवाईक  हजर होते.
....................


टिप्पण्या