स्थानिक उद्योगांमध्ये युवक-युवतींना रोजगाराची संधी! Employment opportunities for youth in local industries!

स्थानिक उद्योगांमध्ये युवक-युवतींना रोजगाराची संधी!

इच्छुकांनी नाव नोंदणी करावी-जिल्हाधिकारी


अकोला:   कोरोना प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे परप्रांतीय मजुर निघून गेल्याने स्थानिक  उद्योजकांकडील आस्थापनांवर मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे.  शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांचे मार्फत स्थानिक कुशल अकुशल रोजगाराच्या संधी शोधणारे युवक युवती व  ज्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे असे उद्योजक यांच्यात दुवा साधण्याचे काम करीत आहे. त्यासाठी शासनाच्या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले असून  त्यामुळे स्थानिक तरुण तरुणींना स्थानिक उद्योगांमध्ये रोजगाराची संधी  मिळेल.

या संदर्भात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला  यांनी कळविले आहे की, कोरोना विषाणु च्या ( कोव्हीड - १९ ) प्रादुर्भावा मुळे अकोला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग औद्योगिक आस्थापनांवरुन आपापल्या गावी परतला आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. उद्योजकांना मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू नये आणि स्थानिक उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांचे मार्फत उद्योजकांशी चर्चा करुन रिक्तपदाचा तपशिल घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील रोजगार इच्छूक उमेदवारांनी आपली नोंदणी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने विकसीत केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर करावी. जेणेकरुन उद्योजकांना त्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होऊ शकेल. ज्या उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे, परंतु आपले आधार कार्ड सेवायोजन कार्डाशी लिंक केलेल नसेल अशा उमेदवारांनी आपल्या लॉगइन आयडी व पासवर्ड चा वापर करुन आधार कार्ड लिंक करुन घ्यावे. तसेच आपली शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता अद्ययावत करून घ्यावी . कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर रिक्तपदे अधिसुचीत करण्याची तसेच पात्र उमेदवारांची यादी प्राप्त करुन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.  जिल्ह्यातील ज्या औद्योगिक आस्थापनांना कुशल अकुशल मनुष्यबळाची आवश्यता असेल अशा आस्थापनांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपली मनुष्यबळाची मागणी नोंदवावी. तसेच याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सु.रा.झळके, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर , प्रशाकीय इमारत दुसरा माळा, अकोला यांचे कार्यालयाशी किंवा ०७२४ - २४३३८४९ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

......................................................

टिप्पण्या